Share

Sushma Andhare । “सत्तेचा केवढा माज म्हणावा की…”; सुषमा अंधारेंचा सत्तारांवर हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

Sushma Andhare । मुंबई : शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दात टीका केलीय. त्यांच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सत्तारांच्या या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया देत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, “भाजपाच्या आश्रयाला गेलेले लोक जे शिंदे गटातील आहेत, वाण नाही पण गुण लागला अशी ज्यांची अवस्था झालेली आहे. जे स्वत:ला बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार समजतात, ते बाळासाहेबांचे वारसदार असू शकत नाहीत.” त्याचबरोबर सत्तारांनी राजीनामा दिला पाहिजे असंही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या, महिलांकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन किती वाईट आहे. ज्या पद्धतीने अब्दुल सत्तार बोलले, त्यानंतरही सत्तेचा केवढा माज म्हणावा की सत्तार असतील किंवा गुलाबराव पाटील असतील, यांनी थेट माफी मागणं टाळलं.”

“काल ज्याप्रकारे अब्दुल सत्तारांनी अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने विधान केलं आणि हे जर ऑनएअर सुरू नसतं तर कदाचित समजलच नसतं की यांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? यांची मानसिकता काय आहे. थेट प्रसारण सुरू असल्याने ते कटही करता आलं नाही. त्यामुळे लोकांच्या लक्षात आलं की हे किती गलिच्छ आणि विकृत मानसिकतेचे लोक आहेत”, असं म्हणत अंधारेंनी अब्दुल सत्तारांना सुनावलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!