Share

MNS | “राष्ट्रवादी XXची औलाद”, मनसेच्या ‘या’ नेत्याची जीभ घसरली

Published On: 

🕒 1 min read

MNS | मुंबई : मनसे (MNS) चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amay Khopkar) यांची राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षावर टीका करताना जीभ घसरलीय. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करताना अपशब्द वापरल्याची बातमी समोर आलीय. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवीगाळ केल्याची बातमी ताजी असताना आता आणखी एक तशीच बातमी समोर आलीय.

यावेळी आम्ही आमच्या एका मराठी प्रेक्षकाला त्याच्या परिवारासमोर तुम्ही दहा-पंधरा जण मारतात? राष्ट्रवादीवाले xxची औलाद आहेत. या लोकांना लाजा नाही वाटतं?, असा घणाघात अमेय खोपकरांनी केला.

तसेच, अमोल मिटकरींना ध्यानात ठेवायचं. त्यांनी काल मला चॅलेंज केलं होतं ना? त्यांचं चॅलेंज स्वीकारलंय. हर हर महादेव चित्रपट पाहण्यासाठी आज ठाण्यात आलोय आणि हा चित्रपट पाहतोय. उगाच जातीपातीचं राजकारण करायचं. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न आहे, असं अमेय खोपकर म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काल ठाण्याच्या एका मॉलमधील चित्रपटगृहात शिरुन हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद केला होता. यावेळी एका प्रेक्षकाला प्रचंड मारहाण झाल्याचं देखील कॅमेऱ्यात कैद झालं होतं. पण त्या प्रेक्षकाला कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती का? ते स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!