🕒 1 min read
Amol Mitkari । मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारित ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. तसेच, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedat Marathe Veer Daudle Saat) हा सुद्धा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांमधून इतिहासाची मोडतोड होत असल्याचा दावा संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केलाय.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही या चित्रपटाला विरोध केला आहे. या चित्रपटांत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा दावा करत या चित्रपटाला विरोध म्हणून जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री ११ वाजता ठाण्यात आंदोलन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या चित्रपटाचा शो बंद पाडल्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी या चित्रटाचा शो पुन्हा सुरू केला. यावरून आता राष्ट्रवादी-मनसे असा वाद पेटलेला असताना आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी एक ट्वीट करत मनसेला चिमटा काढला आहे.
सन्मा. राज साहेब ठाकरे यांनी "हर हर महादेव " या चित्रपटांमध्ये पैसे गुंतवले अशी चर्चा आहे कदाचित म्हणुन काहिकांचा इतका आकांड तांडव सुरु नसेल ना ?राज साहेबांनी खुलासा करावा. आपण शिवप्रेमी आहात म्हणुन विचारतोय @mnsRajthakre999
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 8, 2022
”राज ठाकरे यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटांमध्ये पैसे गुंतवले, अशी चर्चा आहे. कदाचित त्यामुळेच काही लोकांचा इतका तांडव सुरू नसेल ना? राज ठाकरेंनी याचा खुलासा करावा. आपण शिवप्रेमी आहात म्हणून विचारतोय”, अशा आशयाचं ट्विट अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare । “सत्तेचा केवढा माज म्हणावा की…”; सुषमा अंधारेंचा सत्तारांवर हल्लाबोल
- Karuna Munde | “जीवाचं बरं-वाईट झाल्यास धनंजय मुंडे जबाबदार असतील”, करुणा मुंडेंचे गंभीर आरोप
- Travel Guide | भारतातील ‘या’ ठिकाणांना भेट द्यायला काढावे लागते परमिट
- T20 WC 2022 | “आम्ही त्याला…” ; उपांत्य फेरीपूर्वी बेन स्टोक्सचे सूर्यकुमारबाबत मोठे विधान
- Supriya Sule । अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या,
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
