Share

Vijay Shivtare | “सरकार बनवण्यासाठी अजित पवार सकाळी गेले होते तेव्हा..”, विजय शिवतारेंचा सुप्रिया सुळेंना सवाल

Published On: 

Vijay Shivtare | मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी (NCP) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना शिवीगाळ केली. यावरुन राजकीय वर्तुळात चांगलाच धुमाकुळ उडाला. अशातच शिंदे गटाचे अर्थात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी सुप्रिया सुळे यांना सवाल केले आहेत. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

यादरम्यान, जर सुप्रिया सुळे असं म्हणत असतील की ५०-५० खोके घेऊन हे सरकार बनलेलं आहे. तर ज्यावेळी सरकार बनवण्यासाठी अजित पवार सकाळी गेले होते त्यावेळी त्यांना किती खोके मिळाले होते? जरा विचारून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं. १९७८ मध्ये शरद पवारांनी काँग्रेसचं सरकार पाडून पुलोदचं सरकार केलं. ३८ आमदार फोडले होते आणि नवीन सरकार केलं, मग त्या ३८ आमदारांना किती खोके दिले होते तेही सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांना विचारावं आणि आम्हाला सांगावं. १९९९ साली काँग्रेस फोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली बरेचजण इकडे आले, तेव्हा किती खोके दिले तेही आपण सांगावं. २०१९ मध्ये शिवसेनेला भाजपापासून बाजूला करत, शरद पवारांनी नवीन सरकार बनवलं त्यावेळी शिवसेनेला किती खोके दिले होते? याच्याबद्दलही त्यांनी सांगायला हवं, असा पलटवार विजय शिवतारे यांनी केला आहे.

यावेळी, अब्दुल सत्तारांनी काल केलेलं वक्तव्य हे १०० टक्के निषेधार्ह आहे. पक्षाची ही भूमिका मी पक्षाचा अधिकृत प्रवक्ता म्हणून मी सांगत आहे. कोणीही याला समर्थन करणार नाही. परंतु महाराष्ट्राच्या जनतेला दुसरी बाजू सुद्धा कळली पाहिजे. मी ५० आमदारांच्यावतीने सांगतोय हे वक्तव्य का आलं, काल त्यांची मर्यादा सुटली आणि त्यांची जीभ घसरली. पण हे का झालं? प्रत्येक आमदार हा चार-पाच लाख जनतेमधून निवडून येतो आणि त्यांना तुम्ही ५० खोके घेतले असं म्हणून चार महिन्यांपासून बदनाम करत आहात. माणूस किती दिवस संयम ठेवणार? सत्तारांचा संयम काल सुटला? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी काल त्यांना समज दिली असल्याचं देखील शिवतारे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!