🕒 1 min read
मुंबई : आज 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी यांची 153 वी जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यसरकारने (State Government) एक नवीन आभियान राबण्याचा निर्णय घेतला असून, आता सरकारी कर्मचाऱ्यांना फोनवरुन आता ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ (Vande Mataram) या शब्दांनी अभिवादन करावे लागणार आहे.
याची माहिती राज्याचे सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudir Mungantiwar) यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. परंतू काल शनिवारी याचा सरकारी अध्यादेश (जीआर) काढण्यात आला आहे. तर यासंदर्भातील नियम काय आहेत ते जाणून घ्या
नियम –
1.विविध बैठका/सभांमध्ये वक्त्यांनी सुरुवात करतांना ‘वंदे मातरम्’ या शब्दांनी करावी.
2.ज्या ठिकाणी स्वयंचलित दूरध्वनी यंत्रणा अस्तित्वात आहे त्या ठिकाणीही हा बदल करण्यात यावा.
3.सर्व शासकीय कार्यालयांत दूरध्वनीवर / भ्रमणध्वनीवर अभ्यागत किंवा अधिकारी / कर्मचारी यांनी संवाद साधल्यास सुरुवातीचे अभिवादन म्हणून ‘हॅलो’ संबोधन न वापरता, ‘वंदे मातरम्’ म्हणावे.
4.कार्यालय/संस्था येथे दूरध्वनीवरून होणाऱ्या संवादात सुरुवातीस ‘वंदे मातरम्’ हे संबोधन वापरले जाईल यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी सर्व अधिकारी/कर्मचारी यांना प्रोत्साहित करावे.
5.कार्यालयात/संस्थांमध्ये येणाऱ्या अभ्यांगतांनाही सार्वजनिक जीवनात “वंदे मातरम्” ने संबोधन करण्याबाबत जाणीव जागृती करावी.
6.शासकीय कार्यालयांबरोबरच निमशासकीय कार्यालये, शासन सहाय्यित/ अनुदानित / अर्थसहाय्यित व इतर स्वरूपाचे साहाय्य असणारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा/ महाविद्यालये व शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत सर्व प्रकल्प/ उपक्रम/आस्थापना येथील कार्यालयांतही दूरध्वनीवर किंवा भ्रमणध्वनीवर अभ्यागत किंवा सहकारी यांनी संवाद साधल्यास, सुरुवातीला ‘हॅलो’ असे न म्हणता ‘वंदे मातरम्’ असे संबोधन करावे. तसेच त्यांनी त्यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनीवरही संवाद साधतांना ‘वंदे मातरम्’ असे संबोधन करावे.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips | आत्महत्येचा विचार मनात येत असेल तर ती परिस्थिती कशी हाताळावी, जाणून घ्या!
- Chandrakant Khaire | “मी आता मैदानात उतरलोय, काय होईल…” चंद्रकांत खैरेंचा संदिपान भुमरे यांना इशारा
- Car Update | ‘या’ कार मध्ये आहेत सर्वोत्तम सनरुफ फिचर
- Shahajibapu Patil | “पवारांचे गोडवे गाणाऱ्यांनी शिवतीर्थावर जावं तर बाळासाहेबांचा कडवा…”, शहाजीबापू पाटलांचा इशारा
- Amit Shah | “अमित शहा सत्तेतील प्रभावशाली नेत्यांपैकी एक..” राष्ट्रवादीच्या नेत्याचं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
