🕒 1 min read
मुंबई : राणे कुटुंब आणि ठाकरे कुटुंब वाद आता महाराष्ट्राला नवा नाही. नाराणय राणे (Narayan Rane) असो की नितेश आणि निलेश राणे (Nilesh Rane) असो हे उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर जोरदार टीका करत असतात. शिवसेना (Shivsena) देखील त्यांच्या टिकेला उत्तर देत असते. दरम्यान भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. उद्धव ठाकरे बोगस माणूस आहे. (Balasaheb Thackeray) बाळासाहेबांची शिवसेना त्यांनी रसातळाला नेली, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. आता उरलीसुरली शिवसेना देखील उद्धव ठाकरे वाचवू शकणार नाहीत, असे निलेश राणे म्हणाले.
धनुष्यबाण चिन्ह गेलं तर उद्धव ठाकरे यांच्याकडे कुठलाच प्लॅन बी नाही, असे राणे म्हणाले. “उद्धव ठाकरे यांची सेना रसातळाला जाणार आहे. त्यांना आता कोणीही वाचवू शकत नाही. त्यांचे भविष्य ठरलेले आहे. ते उध्वस्त होणार आहेत. आज बाळासाहेबांचा पक्ष १५ आमदारांचा करण्याचे काम कोणी केले असेल तर ते उद्धव ठाकरेंनी केलं. आता १५ आमदार पण राहतील कि नाही यावर पण शंका आहे. कसलाही मास्टर प्लॅन उद्धव ठाकरे यांच्याकडे नसतो, बोगस माणूस आहे,” असा हल्लाबोल निलेश राणे यांनी केले आहे.
विनायक राऊत यांच्या टिकेला निलेश राणे यांचे प्रत्युत्तर-
शिवसेना नेते खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्यांच्या टीकेला काल निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिल आहे.
विनायक राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना निलेश राणे म्हणाले, “कलानगरच्या सम्राटाने घरातील कोंबडी कशी चोरली?”, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच ठाकरेंची अब्रु रस्त्यावर आणायला राऊतच जबाबदार असतील, असा टोलाही निलेश राणे यांनी लगावला आहे.
काय म्हणाले होते विनायक राऊत?-
“शिवसेना जेव्हा स्थापन झाली तेव्हा उद्धव ठाकरे हे सहा वर्षांचे होते, तर नारायण राणे हे चेंबूरच्या नाक्यावर कोंबडी कापत हेते. हा या दोघांमधील फरक आहे”, असं विनायक राऊत यांनी त्यांनी राणेंची खिल्ली उडवली होती.
“चेंबूरच्या नाक्यावर असलेल्या टॉकिजमध्ये तिकीट ब्लॅक करणं, कोंबड्यांच्या माना कापणं, म्हणून त्यांचं नाव कोबंडीचोर पडलं”, अशी घणाघाती टीका राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Jawa 42 Bobber New Launch | जावा (Jawa) ची 42 Bobber लाँच, काय आहे या बाईकची खासियत जाणून घ्या!
- Supriya Sule | “ईडी सरकारने राज्याची थट्टा चालवलीय” ; सुप्रिया सुळेंची खोचक टीका
- Amol Mitkari | “भुजबळ साहेब आपण महात्मा फुलेंचे खरे वारसदार शोभलात…”, अमोल मिटकरींनी केली छगन भुजबळांची पाठराखन
- MPSC Recruitment | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत 378 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Amol Kolhe | … म्हणून अमोल कोल्हेंनी घेतली अमित शहांची भेट, चर्चांना उधाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
