🕒 1 min read
मुंबई : इंदापूरमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांबाबत एक वक्तव्य केलं होतं. अशातच त्यांच्या वक्तव्यावरून भाजप पक्षाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी सुळेंना लक्ष्य केलं आहे.
काय म्हणाले गोपीचंद पडळकर ?
सुप्रिया सुळेंना हे विचारायला हवं की तुमच्या वडिलांच्या नेतृत्वाखाली गेली 40-50 वर्षं महाराष्ट्राच्या राजकारणात काम करत आहात. पण राष्ट्रवादी काँग्रेसला तीन अंकी आमदार कधी निवडून आणता आले नाहीत, असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी आणि सुप्रिया सुळेंना चांगलंच फटकारलं आहे. पडळकरांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते असंही म्हणाले, सुप्रियाताईंनी खरंतर राज्यातल्या लोकांना एक गोष्ट सांगायला हवी. त्यांच्यामागून देशात अनेक लोक आले. ममता बॅनर्जी स्वत:च्या भरंवशावर 3-4 वेळा मुख्यमंत्री झाल्या. मायावती 4 वेळा मुख्यमंत्री झाल्या. समाजवादी पक्षालाही मुख्यमंत्रीपद मिळालं. जगनमोहनसारखा तरुण मुलगा, ज्याच्या वडिलांचा पक्ष गेला, चिन्ह गेलं अशा नवख्या मुलानं एकहाती सत्ता आणली. अरविंद केजरीवाल यांनीही एकहाती सत्ता आणली.
सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य-
दरम्यान, शरद पवार विरोधात गेले की दौऱ्यावर निघतात. पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस महाराष्ट्राचा एक दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Arjun Khotakar | चंद्रकांत खैरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिंदे गटाचे स्पष्टीकरण म्हणाले…
- Instagram Account Recovery | Instagram अकाउंट Hack झाल्यावर काय करायला पाहिजे,जाणून घ्या!
- Chandrashekhar Bawankule | सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, म्हणाले…
- BJP | “… तर २०१४ मध्ये उद्धव ठाकरेच काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्यासाठी गेले असतील”; बावनकुळेंचा पलटवार
- Uddhav Thackeray | धनुष्यबाण कुणाला मिळेल? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी काय? जाणून घ्या सविस्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
