Share

IAS | “… मग उद्या कंडोम देखील मोफत द्यावे लागतील”, महिला आधिकाऱ्याचं संतापजनक वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

पाटणा : महिला आणि बाल विकास महामंडळ, युनिसेफ, सेव्ह द चिल्ड्रन आणि प्लॅन इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सशक्त बेटी, समृद्धी बिहार: टूवर्ड्स एन्हांसिंग द व्हॅल्यू ऑफ गर्ल चाइल्ड’ या विषयावर मंगळवारी बिहार येथे कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बिहार येथील एका महिला आयएस अधिकाऱ्याने असं काही वक्तव्य केलं ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या कार्यक्रमात एका विद्यार्थिनीने सर्व ड्रेस सरकार देते मग सॅनिटरी पॅड मोफत मिळत नाही का?, असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देत आज सॅनिटरी पॅड मागताय उद्या मुलांना कंडोम देखील मुक्त द्यावे लागतील, असं उत्तर महिला अधिकाऱ्याने दिलं आहे.

पाहा व्हिडीओः

यादरम्यान, जनतेच्या मताने सरकार बनतं, असे विद्यार्थिनीने म्हणताच महिला अधिकाऱ्यांनी सर्व मर्यादा पार करून जर तुम्हाला वाटत असेल तर मतदान करू नका, असं उत्तर दिलं. एवढंच नाही तर यावेळी तुम्ही पाकिस्तानला जा असे देखील वक्तव्य त्यांनी केलं आहे.

दरम्यान, मी भारतीय नागरिक आहे तर मी पाकिस्तानला का जाऊ?, असा प्रश्न विद्यार्थिनीने केला. यावर तुम्ही पैसे आणि सेवा मिळवण्यासाठी मत देता का?, असा सवाल महिला अधिकारी ने केला आहे. महिला अधिकारीचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून संताप व्यक्त केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!