🕒 1 min read
मुंबई : काल 24 ऑगस्ट रोजी पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस होता. काल शिंदे गटाचे महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात विधान भवनासमोर धक्काबुक्की झाली. घडलेला प्रकार लाजिरवाणा होता. याच मुद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी कालच्याप्रकारला यूपी, बिहार या राज्याची उपमा दिली आहे.
महाराष्ट्राची यूपी-बिहारकडे वाटचाल-
काल झालेला प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. यापूर्वी असा प्रकार आपल्याकडे कधीच झाला नव्हता. ही यूपी-बिहारकडे वाटचाल असल्याचं, राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज पुण्यामध्ये मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणीला सुरुवात झाली आहे. त्यावेळी राज ठाकरे यांनी प्रसाद माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
राज ठाकरे यांनी व्यक्त केली खंत-
तसेच, प्रभाग रचना तीन किंवा चारचा केल्यामुळे काम करण्यास अडचणी येत आहेत. राष्ट्रवादीने प्रभागातील सदस्य संख्या वाढवण्याचे काम केले असून प्रभाग रचना सातत्याने बदल्याने नगरसेवकांना काम करता येत नसल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.
मनसे प्राथमिक सदस्य नोंदणीला सुरुवात-
दरम्यान, आजपासून मनसे पक्षाच्या प्राथमिक सदस्य नोंदणीला सुरुवात झाली असून, यानिमित्त मनसेने शहर कार्यालयाच्या बाहेर मोठी बॅनरबाजी केली आहे. ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’ अशी टॅगलाइनही या बॅनरवर पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Aditya Thackeray | आदिवासी समाजाला न्याय द्या, आदित्य ठाकरे यांची मागणी
- Karnataka | टिपू सुलतान म्हणजे ‘मुस्लीम गुंड’ ; भाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान, जीभ कापण्याची धमकी
- Rupali Thombre “फडणवीस साहेब पुणे महानगरपालिका, पिंपरी…” रुपाली ठोंबरे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल
- Jayant Patil। पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री केलं – जयंत पाटील
- Devendra Fadanvis | बृहन्मुंबई महापालिकेतील गैरप्रकारांची चौकशी होणार – देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
