🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करुन सत्ता मिळवली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती केल्यामुळे त्यांनी हा बंड केला असल्याचं शिंदेंनी सांगितलं होतं. मात्र, शिंदेंच्या या कारणावर आता प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
अशोक चव्हाण यांचा मोठा गौप्यस्फोटः
२०१४ मध्ये शिवसेनेकडून काँग्रेसला प्रस्ताव आला होता आणि प्रस्तावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यास त्यावेळी सुचवण्यात आलं होतं. मात्र, विशेष बाब म्हणजे त्यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे देखील होते. त्यावेळी चर्चगेट येथील कार्यालयात शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटलं होतं, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.
गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रियाः
दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या बोलण्यात काहीच अर्थ नसून एकनाथ शिंदे गेलेही असतील, कारण पक्षाचे नेते सांगतात तेव्हा जावं लागतं आणि शिवसेनेसोबत जा, असं सोनिया गांधींनी अशोक चव्हाणांना सांगितल्यावर त्यांनाही जावं लागलं, असी प्रतिक्रिया शिंदे गटाच मंत्री गुलाबराव पाटील यांनी अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर दिली आहे.
एकनाथ शिंदे यांचा बंडः
४० आमरांसोबत एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि भाजप सोबत युती करण्याची मागणी केली. यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. एवढंच नाही तर यानंतर राज्यात सत्तांतर झाली आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. मात्र, एकनाथ शिंदे एवढ्यावरच शांत नाही राहिले. त्यांनी थेट शिवसेना पक्षावर आणि धनुष्यबाण चिन्हावर देखील दावा केला आहे. हे प्रकरण सध्या कोर्टात सुरु असून लवकरच निवडणूक आयोग यावर निर्णय देणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Prajkta Mali in London | हास्यजत्रेमध्ये आपल्या अदांनी सर्वांना मोहून टाकणारी प्राजक्ता सोशल मीडियावर ट्रोल
- Vinayak Raut | विनायक राऊतांचा रामदास कदमांवर घणाघात! म्हणाले, “नारायण राणे जात असताना…”
- Sheetal Mhatre | शिल्लक सेनेला ‘असे’ मेसेजस करुन मुंबई मधून महिला गोळा करण्याचा प्रयत्न – शीतल म्हात्रेंचा रश्मी ठाकरेंना टोला
- National sports | राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 : रग्बी स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्ही संघ बाद फेरीत
- World Heart Day | वर्ल्ड हार्ट डे, काय आहे या दिवसाचे विशेष महत्त्व? जाणून घ्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
