Share

Shivsena | “राज्यात दसरा मेळाव्यावरुन महाभारत होणार”, शिवसेनेचा शिंदे गटाला इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना पक्षातील सुलापूर येथील मात्र सर्वत्र संपर्क असलेले शरद कोळी यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे सरकारला इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे सेना परंपरे प्रमाणे शिवाजी पार्कवरील शिवतीर्थावर दसरा मेळावा करीता जाणार आहेत. त्यासाठी कायदा हातात घेतला तरी काही हरकत नाही. उद्धव ठाकरेंसाठी लाखोंच्या संख्येने शिवतीर्थावर उपस्थित राहण्याचे आवाहन कोळींनी केलं आहे. दसरा मेळाव्यामुळे महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा महाभारत घडेल, असं शरद कोळी यांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला दम दिला.

शरद कोळी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी-

शरद कोळी धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक असले तरी त्यांच्यामागे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील शिवसैनिक लाखोंच्या संख्येने शिवतीर्थावर उपस्थित राहणार असल्याची माहिती शरद कोळी यांनी दिली आहे. तसेच सोलापुरातील दहा हजार युवा सैनिक व शिवसैनिक दसरा मेळाव्याला जाणार असून याबाबत युवा सेना व शिवसेनेने जय्यत तयारी केली असल्याची माहिती कोळी यांनी दिली.

शरद कोळी यांच्या या इशाऱ्यामुळे आता शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्या कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शरद कोळींचं नाव दमदाटी, धमकावणे, खंडणी, तडीपार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. दुसरीकडे काँग्रेसचे तत्कालीन ओबीसी मंत्री वडेट्टीवार यांच्यासोबतही कोळी यांचा ओबीसी आंदोलनात सहभाग होता.

दरम्यान, एकनाथ शिंदे गटाला इशारा देत असताना पोलीस प्रशासनाने किंवा महानगरपालिका प्रशासनाने रोखले असता आम्ही कायदा देखील हातात घेणार आहोत, असा गंभीर इशारा यावेळी देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!