🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षाचे युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. लग्नाच्या मुद्द्यावरून ही टीका करण्यात आली होती. यावरून शिवसेना पक्ष प्रचंड भडकला आहे. शिवसेनेने रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी यावेळी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निषणावर धरलं आहे.
सुषमा अंधारे यांचं प्रत्युत्तरः
जो मैदानात असतो, होरिया त्याच्या नावाचा होतो, जे स्टेडियम मध्ये बसलेले असतात त्यांची चर्चा कधीच होत नाही, समालोचक नेहमी मैदानात खेळणाऱ्या खेळाडू बद्दलच बोलत असतात, आदित्य ठाकरे मैदानात आहेत याचा आम्हाला अभिमान असल्याचं यावेळी सुषमा अंधारे म्हणाले आहेत. तसेच त्यांच्या लग्नाबद्दल टीका-टिप्पणी झाली त्यांच्या लग्नाची काळजी करायला त्यांचे आई-वडील समर्थ आहेत, याची काळजी मिंधे सेनेने करण्याची गरज नाही, असं सुषमा अंधारो म्हणाल्या.
अमृता फडणवीस यांच्या साधला निशाणाः
यादरम्यान, सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. अमृताजी पक्षात नसताना सुद्धा त्यांचं मॉडेलिंगचं करिअर सोडून इकडे येत आहेत, त्याबद्दल आम्ही कधी चिंता व्यक्त केली का? नाही केली, काय गरज आहे, त्यांचे यजमान मुख्यमंत्री असताना त्यांच्यासाठी पोलिसांना वेठीस ठरवून शोची विक्री करायची मेहनत घेत होते ना?, अशी टीका अंधारेंनी फडणवीसांवर केली आहे.
नरेंद्र मोदी यांना वाटलं आपण विभक्त राहायचं आहेः
हे बघा मोदींचं लग्न झालं, त्यांची काही अडचण होती, त्यांना वाटलं आपण विभक्त राहायचं आहे, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, मोदीजींच्या निर्णयाचा आपण सन्मान केला पाहिजे. मोदीजींच्या या निर्णयामुळे त्यांच्या कामावर कसं काय प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो?, असा सवाल करत अंधारे यांनी मोदींवर निशाणा साधला.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या लग्नाचा प्रश्न काढून तुम्हाला आदित्य ठाकरेंनी प्रश्न विचारले त्यांची उत्तरे मिळणार आहेत का? असं करुन तुम्हाला वेदांत फॉक्सकाॅन परत आणता येणार आहे का? तुम्हाला इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येणार आहेत का? सध्या जे काही महिला असुरक्षित असल्याचं वातावरण आहे ते सोडवता येणार आहे का? अशा प्रश्नांची चांगलीच मोठी यादी सुषमा अंधारे यांनी उपस्थित केली आहे.
आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा मुद्दा हा केवळ बालिश चाळा असून बाळासाहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर आदित्यच्या लग्नाची काळजी घ्यायला त्यांचे मायबाप खंबीर आहेत, त्यासाठी रामदास कदम यांनी उगाच आपलं वधू वर सूचक मंडळ घेऊन लुडबुड करू नये, आम्ही खंबीर आहोत, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Samsung Sale 2022 | सॅमसंग गॅलेक्सी फोन, टॅब्लेट आणि वेअरेबलवर बंपर सूट
- Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथील पाणीपुरवठा योजनेचे ई- भूमिपूजन
- Chandrakant Patil | चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती
- Sandeep Deshpande | “शिवसेना ही शरद पवार यांच्या पिंजऱ्यातील मांजर आहे”
- Government scheme | ‘या’ सरकारी योजनेत गुंतवणूक करून तुमच्या लेकीचे भविष्य करा सुरक्षित!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
