Share

Dussehra Melava | उद्या होणार हायकोर्टात सुनावणी! दसरा मेळावाबाबत शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अद्याप परवानगी दिलेली नाही. यामुळे शिवसेना पक्षाच्या गटांमधील अस्वस्थता वाढली आहे. शिवसेनामध्ये सध्या उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असे दोन गट आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने शेवटचा पर्याय म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेना आणि शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी मुंबई महापालिकेविरोधात केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती रमेश धनुका व न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठाने उद्याच या याचिकेवर तातडीची सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार की नाही, याचा फैसला उद्याच होण्याची शक्यता आहे.

दसरा मेळावा करीता शिवसेना विरुद्ध शिंदे गटात लढाई सुरु :

मुंबईच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरुन सध्या शिवसेना विरुद्ध शिंदे गटात लढाई सुरु आहे. मात्र, शिंदे गटाला बीकेसी येथे मेळावा घेण्याची परवानगी मिळाली आहे. तरी या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेच्या बाजूने उडी घेतली होती. अजित पवार यांनीही उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी मागणी केली.

उद्धव साहेबांनी आणखी काही दिवस परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत :

उद्धव साहेबांनी आणखी काही दिवस परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. दसरा मेळाव्याची वेळ जवळ आली आहे, ५ ऑक्टोबरला हा मेळावा होणार आहे. त्यामुळे आता उच्च न्यायालयात जाऊन परवानगी घेण्यात यावी. यापूर्वीही अशाप्रकारे परवानग्या घेण्यात आल्या आहेत. शिंदे गटाला बीकेसी येथे मेळावा घेण्याची परवानगी मिळाली आहे. मग शिवाजी पार्कची जागा उद्धव ठाकरे यांना मिळावी. राज्यातील जनतेला दोघांचेही विचार ऐकायला मिळावेत, असे अजित पवार यांनी म्हटले होते.

मुंबई महापालिका, मुंबई महापालिका आयुक्त आणि जी-उत्तर वॉर्डचे सहायक आयुक्त यांच्याविरोधात शिवसेनेची रिट याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती रमेश धनुका यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ किंवा न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणीची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!