🕒 1 min read
आजकाल स्कूटर (टु व्हीलर) प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामध्ये भारतीय बाजारपेठेत महिलांसाठी अनेक उत्तम स्कूटर पर्याय उपलब्ध आहेत. पण त्यामध्ये सुरक्षेपासून ते किमतीपर्यंत सर्वोत्तम स्कूटर कोणते आहेत ते जाणून घेऊया. तुम्हीही नवीन स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.
महिलांसाठी सर्वोत्तम स्कूटर
TVS NTORQ 125
TVS NTORQ ही भारतीय बाजारपेठेत चांगली दिसणारी स्कूटर आहे. यासोबतच यामध्ये अनेक तंत्रांचा वापर करण्यात आला आहे. स्कूटरच्या काही प्रकारांमध्ये LED DRL सह LED हेडलॅम्प देखील मिळतात. ही 125cc स्कूटर आहे आणि तिचे वजन 116.1 किलो आहे. ज्यामुळे ही स्कूटर महिलांसाठी सर्वोत्तम स्कूटर बनते. TVS Ntorq 125 मध्ये 125cc इंजिन आहे जे 7,000rpm वर 9.25bhp आणि 5,500rpm वर 10.5Nm टॉर्क जनरेट करते. या स्कूटरची किंमत 83,987 रुपये आहे.
होंडा डिओ (Honda Dio)
होंडा डिओ दीर्घकाळ लोकांच्या मनावर राज्य करत आहे. त्याची रचना अतिशय नवीन पद्धतीने करण्यात आली आहे. त्याच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, हे 109.51cc, सिंगल-सिलेंडर इंजिनद्वारे समर्थित आहे जे 8,000rpm वर 7.65bhp आणि 4,750rpm वर 9Nm टॉर्क जनरेट करते. या स्कूटरची किंमत 71,134 रुपये आहे.
यामाहा फॅसिनो 125 (Yamaha Fascino 125)
यामाहा फॅसिनो 125 ही या यादीतील सर्वात स्टायलिश स्कूटरपैकी एक आहे. या स्कूटरच्या एका बाजूला कर्व आणि फ्लैट बॉडी पैनल आहे. यासोबतच, जर तुम्हाला रंगांची आवड असेल, तर कंपनीने तुमच्यासाठी अनेक रंगांचे पर्यायही दिले आहेत. त्याचबरोबर मायक्रो-हायब्रीड प्रणाली आणि स्टार्टर-जनरेटर मोटरचा वापर यात करण्यात आला आहे. यामध्ये, 125cc इंजिन 6,500rpm वर 8.0bhp आणि 5,000rpm वर 10.3Nm टॉर्क जनरेट करते. हे 125cc इंजिन 6,500rpm वर 8.0bhp टॉर्क आणि 5,000rpm वर 10.3Nm टॉर्क जनरेट करते. या स्कूटरची किंमत 78,443 हजार रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या
- Shivsena | आदित्य ठाकरेंच्या लग्नावरुन शिवसेनेनं नरेंद्र मोदी अन् अमृता फडणवीसांना धरलं धारेवर, म्हणाले…
- Samsung Sale 2022 | सॅमसंग गॅलेक्सी फोन, टॅब्लेट आणि वेअरेबलवर बंपर सूट
- Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथील पाणीपुरवठा योजनेचे ई- भूमिपूजन
- Chandrakant Patil | चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती
- Sandeep Deshpande | “शिवसेना ही शरद पवार यांच्या पिंजऱ्यातील मांजर आहे”
- Government scheme | ‘या’ सरकारी योजनेत गुंतवणूक करून तुमच्या लेकीचे भविष्य करा सुरक्षित!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
