Share

Sushma Andhare| शिवसेना महिला नेत्यानं रामदास कदम यांना दिला इशारा म्हणाल्या…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  शिंदे गटाने रविवारी पहिला मेळावा घेतला. त्यावेळी शिंदे गटातील नेते रामदास कदम दापोली येथील सभेत बोलताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. मी बाळासाहेबांचा मुलगा आहे असं किती वेळा सांगणार? काही संशय आहे का?, असा खोचक सवाल केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना नेते आक्रमक झाले आहेत. अशातच शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे ?

रामदास कदमांनी राज्यात कुठेही फारावे. शिवसेना त्यांना उत्तर देईल, असा थेट इशारा सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांनी दिला आहे. सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

हे शिंदे सेनेतील नव्हे तर मिंधे सेनेतील लोक –

पुढे त्या बोलताना म्हणाल्या, रामदास कदम यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. त्यांचे मानसिक संतूलन ढासाळले असून त्यांनी धसका घेतला आहे. जे दुसऱ्यांना शिल्लक सेना म्हणत आहेत त्यांच्याकडे इमानदारी शिल्लक नाही. ते मिंधे आहेत. हे शिंदे सेनेतील नव्हे तर मिंधे सेनेतील लोक आहेत.

त्यांच्याच चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत –

तसेच, मातोश्रीने रामदास कदम आणि गद्दारांना खूप प्रेमाणे सांभाळलं. त्यांना कधीही उपाशीपोटी बाहेर पडू दिले नाही. मिनाताई ठाकरे यांनी काळजीने त्यांची सरबराई केली आणि आता हेच लोक त्यांच्याच चारित्र्यावर शिंतोडे उडवत असल्याचंही सुषमा यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!