Share

Ajit Pawar । राजकीय दबावातूनच वेदांता प्रकल्प गुजरातला; अजित पवारांनी घेतली तातडीने मुख्यमंत्र्यांची भेट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वेदांत ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रोजेक्ट गुजरातला गेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले. फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात येण्याची सर्व प्रक्रिया झाली होती, असं ठाकरे सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेल्या सुभाष देसाईंनी म्हटलं आहे. यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. शिंदे फडणवीस सरकारमुळे हा प्रकल्प गुजरातला गेला आहे, असा आरोप होतो आहे. मात्र हा प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यातील विरोधी पक्षाचे नेते आक्रमक झाले आहेत. यावरून आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरलं आहे.

काय म्हणाले अजित पवार ?

महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बाधा आणणारा आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणावर याचा दीर्घकालीन परिणाम होणार असून महाराष्ट्राच्या हितासाठी राज्य सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करत महाराष्ट्राबाहेर जाणारी गुंतवणुक थांबवत हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी पवार यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून केली.

पुढे अजित पवार म्हणाले, ‘वेदांता’ ग्रुप व तैवॉन येथील फॉक्सकॉन या कंपनीचे 60:40 असे जॉईन्ट व्हेंचर असणारा महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण असणारा सेमीकंडक्टर व डीस्पले फॅब्रीकेशनचा तळेगांव येथे येणारा ‘वेदांता’ ग्रुपचा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातला जाण्याच्या वाटेवर आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्याविषयी विविधस्तरावर विशेष प्रयत्न करण्यात आले होते.

राज्याच्या उद्योगमंत्र्यांनीं काय स्पष्टीकरण दिले –

फॉक्सकॉन वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रातच येणार हे मागच्या दोन महिन्यात नक्की झालेलं नव्हतं. त्यांनी गुजरातकडे प्रस्ताव दिला होता, इतर राज्यांकडेही प्रस्ताव दिला होता. हा प्रकल्प महाराष्ट्रात येण्याची सुरूवात ही काही दोन महिन्यांपूर्वी झालेली नाही ती एक वर्षापूर्वी झाली आहे. विरोधक जो उल्लेख करत आहेत त्या बैठका मागच्या दोन महिन्यात झाल्या. चांगलं पॅकेज कसं देता येईल यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली होती. वर्षभरात ज्या चर्चा होणं अपेक्षित होती ती झाली नव्हती. यात मी राजकारण आणत नाही, असं सामंत म्हणाले.

जर बैठका वेळेवर झाल्या असत्या तर प्रकल्प महाराष्ट्रात आला असता. चांगलं झालं तर आमच्यामुळे झालं आणि वाईट झालं तर ते सरकारमुळे झालं असं जे काही पसरवण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत ते योग्य नाही असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ही बातमी आल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

पुढे सामंत म्हणाले कि, उद्योग मंत्री होऊन मला १५-२० दिवस झाला. नवीन मुख्यमंत्री होऊन दोन महिनेच झाले आहे. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही या कंपीना आधिच्या सरकारच्या तुलनेत अधिक सुविधा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तरी सुद्धा ही कंपनी गुजरातला का गेली, याची माहिती घेणार आहे. राजकारण करण्यापेक्षा हा प्रकल्प पुन्हा राज्यात आण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. फक्त राजकारण करु नये, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!