Share

Sharad Pawar | “दिल्ली समोर झुकणार नाही”; शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली :  सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांची तयारी सुरू झाली असल्याचं पाहायला मिळतं आहे. तर भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालकिल्ला असलेल्या बारामतीला लक्ष्य  केलं जात आहे. यावरून भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांमध्ये चांगलीच टीकेबाजी सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

शदर पवार यांचे वक्तव्य-

आम्ही दिल्लीसमोर झुकणार नाही, असं म्हणत शरद पवार यांनी भाजपवर हल्ला केला आहे. नवी दिल्लीत राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय कार्यकारणी मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते, त्यावेळी ते बोलले आहेत.

शरद पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आम्हाला प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला गोष्ट शिकवली आहे, दिल्ली समोर झुकणार नाही.

तसेच, शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीकास्त्र सोडलं आहे. 15 ऑगस्टला मोदींनी लाल किल्ल्यावरून महिलांच्या आदराविषयी भाषण केलं. एकीकडे महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी करायच्या, अन् दुसरीकडे आपल्या गुजरात राज्यात बिलकीस बानो हिच्यावर अत्याचार करणारे, तिच्या कुटुंबातील सदस्यांची हत्या करणाऱ्या लोकांची शिक्षा माफ करण्याची.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!