🕒 1 min read
बारामती : २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची तयारी भाजपने आतापासूनच सुरु केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात नियोजित ‘भाजप बारामती लोकसभा मतदारसंघ मिशन’ला सुरवात झाली आहे. यावरुन भाजपने बारामतीला दिलेले राजकीय महत्त्व अधोरेखित होत आहे. मात्र यानंतर या सर्व घडामोडींवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याधीही प्रतिक्रिया दिली होती. आता पुन्हा एकदा यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
असे कितीतरी जण आले आणि गेले 55 वर्षांत. पण बारामतीकरांना माहिती आहे, कुणाचे बटण दाबायचे ते, असा टोला अजित पवार यांनी भाजपाला लगावला आहे. अखिल मंडई गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणूकप्रसंगी ते बोलत होते. बारामतीत माझे काम बोलते. माझ्यापेक्षा कुणी जास्त काम केले असेल तर बारामतीकर त्याचा विचार करतील. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, असंही ते म्हणाले.
पुढे अजित पवार म्हणाले कि, नवीन अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनाही वाटते आपण काहीतरी करतो. ते बारामतीला आले म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली. इतर कुठे गेले असते तर त्यांना तुम्ही इतकी प्रसिद्धी दिली नसती. तुम्ही इतके संघटनेमध्ये सक्रिय होतात, मग पक्षाने तुम्हाला, तुमच्या पत्नीला उमेदवारी का नाकारली याचे उत्तर द्या, असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांना अजित पवार यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | “माझ्यापेक्षा जास्त काम करणारं कुणी असेल, तर…”; – अजित पवार
- Ajit Pawar | “कुणाचं बटण कसं दाबायचं, हे चांगलं माहितीये त्यांना”-अजित पवार
- Shivendraraje Bhosale | “उदयनराजे भोसले चवताळल्यासारखे वागतात”;शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर पलटवार
- Queen Elizabeth | इंग्लंडच्या महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या यांचे निधन
- Eknath Shinde । ‘जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाईल’; याकूब मेमन कबर प्रकरणी मुख्यमंत्री शिदेंनी दिला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
