Share

Ajit Pawar | “माझ्यापेक्षा जास्त काम करणारं कुणी असेल, तर…”; – अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्यामध्ये सध्या निवडणुकांचं वारं घुमू लागलं आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या खेळी रंगलेल्या पाहायला मिळतं आहेत. काहीदिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४मध्ये भाजप बारामती जिंकणार, असं वक्तव्य केलं होतं. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अजित पवार यांचे वक्तव्य-

बारामतीमध्ये माझं काम बोलतं. त्यामुळे तुम्ही बारामतीची काळजी करू नका. माझ्यापेक्षा जास्त काम करणारं कुणी असेल, तर बारामतीकर त्याचा विचार करतील,असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. आज अजित पवार पुण्यामध्ये अखिल मंडई गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणूक कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

बारामतीकरांना कुणाचं बटण कसं दाबायचं, हे चांगलं माहितीये. त्यामुळे बारामतीकर येत्या निवडणुकीत त्यांचं काम चोखपणे बजावतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नसल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे.

तसेच,कोरोना काळात गणेशोत्सव साजरा करता येत नव्हता. यंदाचा गणेशोत्सव सर्वांनी आनंदाने साजरा केला. काहींनी आठव्या, नवव्या दिवशी गणपती विसर्जन केलं आहे. त्याचबरोबर कोरोनानंतर यावर्षी मिरवणूक निघत आहे. त्यामुळे सर्वांनी मिरवणुकीमध्ये काळजी घ्यावी, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!