Share

Aditya Thackeray | “शिवसेनेला संपवायला निघालेला एक एक चेहरा आता पुढे येतोय”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  एकनाथ शिंदे यांचं राज्यात सरकार आल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. त्याचप्रमाणे आगामी निवडणुकांमध्ये कोणता पक्ष कोणत्या पक्षाशी युती करणार याविषयाच्या अनेक चर्चा सध्या राज्यात सुरू आहेत. अशातच आज महाराष्ट्र नवनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या सरकारी निवास्थानी जाऊन गणपीतीचं दर्शन घेतलं आहे. या भेटीमुळे मनसे आणि शिंदे गटाच्या युतीबाबत बोललं जात आहे. यावर शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे यांचे वक्तव्य-

चांगलं आहे. जे शिवसेनेला संपवायला निघाले आहेत ते चेहरे दिसत आहेत. एक एक करुन देत पुढे येत आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे नवी मुंबईमध्ये गणपती दर्शनासाठी आले होते त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांना पत्रकारांनी मनसे आणि शिंदे गटाच्या युतीबाबत विचारले असता, तेव्हा ते बोलत होते.

गलिच्छ राजकारण मी पाहिलं नाही-

आदित्य ठाकरे यांना दसरा मेळाव्यासंदर्भात विचारले असता, त्यात म्हणणं काय आहे? शिवसेनेचा मेळावा शिवतीर्थावरच होतो, असं त्यांनी सांगितलं. पुढे ते असंही म्हणाले की, सध्या जे महाराष्ट्रात सुरु आहे कोणालाही पटणारं नाही. याप्रकारचं गलिच्छ राजकारण मी पाहिलं नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.

तसेच, आदित्य ठाकरे यांना ते गणपतीचे दर्शन घेण्यासाठी फिरत आहेत, त्यावेळी कसा प्रतिसाद असतो, हा सवाल विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, मी लहानपणापासून वडिलांसोबत फिरत होतो. शंभरहून अधिक गणपतींचं दर्शन मी घेतलं आहे. आज नवी मुंबईमध्ये आलो आहे दर्शनसाठी. गणपती बाप्पाचं दर्शन आणि जे शिवसैनिक कठीण काळात आमच्यासोबत उभे राहिले त्याचं देखील दर्शन घ्यायला आज मी मुंबईत आलो आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!