🕒 1 min read
मुंबई : शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादात आता बच्चू कडूंनी उडी घेतली आहे. दसरा मेळावा कोण घेणार यावरुन वाद सरु असल्याने त्याची सुनावणी घटनापीठासमोर होणार होती. त्यामुळे सरन्यायाधीश यू.यू ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज सुनावणी करण्याचं अश्वासन दिलं होतं. या प्रकरणावर 5 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सुनावणी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. अर्थातच आजही सुनावणी झाली नसून तारीख पुढं ढकलण्यात आली आहे. याच पाश्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी दसरा मेळावा तसेच शिवसेना यांवर प्रतिक्रीया दिली आहे.
बच्चू कडू यांची धनुष्यबाणवर प्रतिक्रीयाः
धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर अधिक संभ्रम निर्माण होईल, असं बच्चू कडू म्हणाले. तसेच ज्याची शिवसेना त्याचा दसरा मेळावा, एकनाथ शिंदे साहेबांची सेना आहे, म्हणून एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
10 मिनिटं अंतीम याचिकेवर सुनावणी ऐकून घेऊ, त्यानंतर निवडणूक आयोगावर निर्णय घेऊ, पण निवडणूक आयोग आणि पक्षकारांनी 27 सप्टेंबर रोजी थोडक्यात युक्तिवाद करावा, असे निर्देश घटनापीठाने दिला आहे. त्यामुळे आता 27 तारखेला निकाल कोणाच्या बाजूने लागणार, हे पाहणं महत्वाचं ठरेल. तसेच शिवसेनेवर विजय मिळवल्यानंतर शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होईल का? आणि झालाच तर तो कोण घेणार? हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल.
महत्वाच्या बातम्याः
- Amit Shah | अमित शहा यांच्या ताफा जाण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेलाही अडवलं, पाहा व्हायरल व्हिडीओ
- Jayant Patil | सेफ्ली पाॅईंटला जयंत पाटलांची सेल्फी घेताना व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
- Devendra Fadnavis | सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे निराश,आशा लोकांवर फार बोलायचं नसतं – देवेंद्र फडणवीस
- Devendra Fadnavis | “आमचं मिशन बारामती नाही तर मिशन इंडिया”
- Shambhuraj Desai | “धनुष्यबाण आमचाच आहे…”, शंभुराज देसाई यांची प्रतिक्रीया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
