Share

Amit Shah | अमित शहा यांच्या ताफा जाण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेलाही अडवलं, पाहा व्हायरल व्हिडीओ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबई दौरा होता. त्यांनी मुंबईमध्ये आल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. त्याचप्रमाणे लालबागच्या राजाचंही दर्शन घेतलं. हे सगळं असताना, अमित शहा यांच्या ताफा जातानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये अमित शहा यांच्या  जाण्यासाठी चक्क एका रूग्णवाहिकेला अडवलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे या व्हिडीओची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एकीकडे अमित शहा यांच्या गाड्या चालल्या आहेत. तर दुसरीकडे काही गाड्यांना वाहतूक पोलिसांनी अडवून ठेवलं आहे. यामध्ये एका रुग्णवाहिकेचाही समावेश असल्याचं दिसून येतं आहे.

अमित शहा यांच्या दौऱ्यातील व्हिडीओ-

या व्हिडीओवर मुंबई वाहतूक पोलिसांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ते म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्र्यांचा ताफा जाणार असल्याकारणाने या ठिकाणची वाहतूक रोखण्यात आली होती. याचवेळी एक रुग्णवाहिकाही त्याठिकाणी होती. पण महत्त्वाची बाब म्हणजे या रुग्णवाहिकेत कुणीही रुग्ण नव्हता. असं पोलिसांनी म्हटलं आहे.

तसेच काही तांत्रिक बिघाडामुळे रुग्णवाहिकेचा सायरन बंद होत नव्हता. त्यामुळे रुग्णवाहिकेचा सायरन सुरुच असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून आलं आहे. त्याचबरोबर याबाबत रुग्णवाहिका चालकाचाही जबाबब लवकरच नोंदवून घेतला जाईल, असंही वाहतूक पोलिसांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!