🕒 1 min read
मुंबई : सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबई दौरा होता. त्यांनी मुंबईमध्ये आल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. त्याचप्रमाणे लालबागच्या राजाचंही दर्शन घेतलं. हे सगळं असताना, अमित शहा यांच्या ताफा जातानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?
या व्हिडीओमध्ये अमित शहा यांच्या जाण्यासाठी चक्क एका रूग्णवाहिकेला अडवलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे या व्हिडीओची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एकीकडे अमित शहा यांच्या गाड्या चालल्या आहेत. तर दुसरीकडे काही गाड्यांना वाहतूक पोलिसांनी अडवून ठेवलं आहे. यामध्ये एका रुग्णवाहिकेचाही समावेश असल्याचं दिसून येतं आहे.
This is very sad to see where an ambulance was asked to wait so that @AmitShah could pass by. @ndtv@ndtvvideos @BrutIndia @aajtak
@MumbaiPolice #AmitShah #roadsafety #road #Ambulance #VIP #life #lifematters #marol #andheri pic.twitter.com/uqXUZ6n2U6— Jesson Jose (@JoseJesson) September 5, 2022
अमित शहा यांच्या दौऱ्यातील व्हिडीओ-
या व्हिडीओवर मुंबई वाहतूक पोलिसांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ते म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्र्यांचा ताफा जाणार असल्याकारणाने या ठिकाणची वाहतूक रोखण्यात आली होती. याचवेळी एक रुग्णवाहिकाही त्याठिकाणी होती. पण महत्त्वाची बाब म्हणजे या रुग्णवाहिकेत कुणीही रुग्ण नव्हता. असं पोलिसांनी म्हटलं आहे.
So @MumbaiPolice has clarified that there was no patient in ambulance that was stopped to allow HM convoy to pass by. Ambulance Siren the police say was ‘dysfunctional’ so it couldn’t be turned off! #Ambulance #VVIP https://t.co/OxrJSY94d8
— Rajdeep Sardesai (@sardesairajdeep) September 7, 2022
तसेच काही तांत्रिक बिघाडामुळे रुग्णवाहिकेचा सायरन बंद होत नव्हता. त्यामुळे रुग्णवाहिकेचा सायरन सुरुच असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून आलं आहे. त्याचबरोबर याबाबत रुग्णवाहिका चालकाचाही जबाबब लवकरच नोंदवून घेतला जाईल, असंही वाहतूक पोलिसांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadnavis | “आमचं मिशन बारामती नाही तर मिशन इंडिया”
- Shambhuraj Desai | “धनुष्यबाण आमचाच आहे…”, शंभुराज देसाई यांची प्रतिक्रीया
- Devendra Fadnavis | “सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांना निराशा”
- Shivsena | निर्णय नाहीच, पुढची सुनावणी 27 सप्टेंबर रोजी; घटनापीठ नेमकं काय म्हणाले?
- Jitendra Awhad | “बावनकुळे सोडा लाख कुळे आली तरी…”; जितेंद्र आव्हाडांचे बावनकुळेंना प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
