Share

Shivsena | निर्णय नाहीच, पुढची सुनावणी 27 सप्टेंबर रोजी; घटनापीठ नेमकं काय म्हणाले?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सुप्रीम कोर्टाने तत्काळ सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरू ठेवण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी एकनाथ शिंदे गट कडून करण्यात आली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या याचिका कोर्टात प्रलंबित आहेत. अशातच शिवसेना कोणाची या प्रकरणाची सुनावणी निर्णयक टप्प्यावर असल्याची माहिती सुप्रिम कोर्ट कडून देण्यात आली होती. तसेच आज या प्रकरणाची सुनावणी होती.

शिवसेना कोणाची? प्रकरणाची आजही सुनावणी नाही:

शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर आज बुधवारी घटनापीठाची स्थापना केली जाणार असल्याचं आश्वासन सर्वोच्च न्यायालयाने दिलं होतं. त्यामुळे सरन्यायाधीश यू.यू ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज खंडपीठाची स्थापना केली. या प्रकरणावर 5 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सुनावणी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. अर्थातच आजही सुनावणी झाली नसून तारीख पुढं ढकलण्यात आली आहे.

27 सप्टेंबर रोजी ही सुनावणी होणार असल्याचं सुप्रीम कोर्टने म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची याचा निकाल आजही लागलेला नाही. 10 मिनिटं अंतीम याचिकेवर सुनावणी ऐकून घेऊ. त्यानंतर निवडणूक आयोगावर निर्णय घेऊ. पण निवडणूक आयोग आणि पक्षकारांनी 27 सप्टेंबर रोजी थोडक्यात युक्तिवाद करावा, असे निर्देशही घटनापीठाने दिले आहे.

एकनाथ शिंदे गटाकडून मागणीः

दरम्यान, आगामी काळात काही निवडणुकांच्या आधी शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि इतर बाबींचा निकाल लागणं आवश्यक आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने तात्काळ सुनावणी घ्यावी, निवडणूक आयोगाची सुनावणी सुरू ठेवण्याबाबत स्पष्टता करावी, अशी विनंती याचिका अर्थात रीकट याचिका शिंदे गटाने केली आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!