🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळावा वरून शिवसेना आणि शिंदे गट यांमध्ये राजकारण तापलं आहे. मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची मागणी उद्धव ठाकरे यांनी महापालिकेकडे केली आहे. मात्र अद्याप त्यांना मंजुरी मिळाली नाही. अशातच एकनाथ शिंदे गटाने प्लॅन बी तयार ठेवला असल्याची बातमी काल समोर आली होती. यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
दीपक केसरकर यांची प्रतिक्रीयाः
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचारांवर चालतात. बाळासाहेबांच्या प्रथा परंपरा कायम ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार आहे. दसरा मेळावा हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे आम्ही दसरा मेळावा घेणारच आहोत, असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर लगावला टोलाः
यावेळी केसरकरांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही टोला लगावला आहे. त्यांनी दसरा मेळावा घेतला तर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला स्टेजवर बोलवावं म्हणजे लोकांना कळेल कोण बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेलं आहे, असं म्हणत केसरकरांनी निशाणा साधला.
दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याबाबत बोलताना सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर मी बोलणार नाही, जे काही होईल ते कायद्याने होणार, असं केसकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्याः
- Deepak Kesarkar | दसरा मेळावाबाबत दीपक केसरकरांची प्रतिक्रीया, म्हणाले…
- Shivsena | शिवसेना – शिंदे गटाच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय
- Ravi Narayan | मनी लाँडरिंग प्रकरणी राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी प्रमुख रवी नारायण यांना अटक!
- Aditya Thackeray | आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले आव्हान, म्हणाले…
- Uddhav Thackeray | अमित शहांच्या ‘जमीन दाखवण्याची वेळ आलीय’ टीकेवर उद्धव ठाकरे म्हणाले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
