🕒 1 min read
मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना कोणाची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोर्टात धाव घेतली होती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देऊ नये, यासाठी एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
एकनाथ शिंदे गटाची सुप्रिम कोर्ट मध्ये धावः
सुप्रीम कोर्टाने तत्काळ सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरू ठेवण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिका कोर्टात प्रलंबित आहेत. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठा समोर ही सुनावणी होत असून सुनावणी होईपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. मात्र, कोर्टाच्या निर्णयाआधीच शिवसेना पक्षाविषयी निर्णय लागणं महत्त्वाचं असल्याचं शिंदे गटाने म्हटलं आहे.
येत्या काळात राज्यातील विविध महापालिकांची निवडणूक होणार आहे. तसेच मुंबईतल्या अंधेरी पूर्वीचे आमदार रमेश लटके यांचे निधन झालं असून त्यांच्या जागेसाठीची पोटनिवडणूक ही घेतली जाणार असल्याने उमेदवार उभे करण्यासाठी तसेच त्यांच्या चिन्हा विषयाचा वाद मिटवण्यासाठी आयोगाचा निर्णय महत्त्वाचा आहे. त्यामुळे शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
दरम्यान, आगामी काळात काही निवडणुकांच्या आधी शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि इतर बाबींचा निकाल लागणं आवश्यक आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने तात्काळ सुनावणी घ्यावी, निवडणूक आयोगाची सुनावणी सुरू ठेवण्याबाबत स्पष्टता करावी, अशी विनंती शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Gulabrao Patil | आदित्य ठाकरेंनी वयाचा विचार करावा, नाहीतर…; गुलाबराव पाटलांचा इशारा
- Raosaheb Danve | “ज्यांच्यासोबत 40 आमदार आहेत त्यांचाच दसरा मेळावा शिवाजी पार्कवर व्हावा”, रावसाहेब दानवे
- Sanjay Shirsat | “… म्हणून मुंबईला निघालो”, नाराज संजय शिरसाट अखेर निघाले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
- Tanaji Sawant | शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची – तानाजी सावंत
- Raj Thackeray | राज ठाकरे ‘वर्षा’वर घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, चर्चांना पुन्हा उधाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
