🕒 1 min read
India Vs Pakistan : रविवारी झालेल्या आशिया चषक 2022 सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. या विजयाबद्दल माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने टीम इंडियाच्या गोलंदाजांचे कौतुक केले आहे. वेगवान गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच भारताला पाकिस्तानविरुद्ध यश मिळाले, असे सचिन तेंडुलकरचे मत आहे.
पाकिस्तानविरुद्ध चमकदार कामगिरी करत भारताच्या वेगवान गोलंदाजांनी सर्व 10 बळी घेतले. सचिन तेंडुलकर म्हणाला, हा सामना वेगवान गोलंदाजांच्या फिटनेसवर गेला होता. आमचे वेगवान गोलंदाज दबाव निर्माण करण्यात यशस्वी झाले. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली, असे सचिन तेंडुलकर म्हणाला.
सचिन तेंडुलकर याने पांड्याचे केले कौतुक-
सचिन तेंडुलकरनेही हार्दिक पांड्याच्या फलंदाजीचे कौतुक केले. “हार्दिक पांड्याची खेळी खूप महत्त्वाची होती. तो शेवटपर्यंत राहिला आणि संघाला विजय मिळवून देऊनच परतला. विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांची फलंदाजीही उत्कृष्ट होती. या विजयासाठी टीम इंडियाचे अभिनंदन,” असे तेंडुलकर म्हणाला.
It came down to fitness of the fast bowlers while put under pressure, though both teams’ pacers bowled well upfront.
Crucial knock by Hardik to stay till the end & get us over the line & ably supported by @imjadeja & Virat.
Congrats ???????? on a nail-biting win.#INDvsPAK pic.twitter.com/dYhiaa3Omh
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 28, 2022
गोलंदाजांची उत्कृष्ट कामगिरी-
पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरविला. भुवनेश्वर कुमारने बाबर आझमला 10 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. यानंतर पाकिस्तान संघाला सामन्यात पुनरागमन करता आले नाही.
भुवीच्या चार आणि हार्दिक पांड्याच्या तीन विकेट्समुळे टीम इंडियाने पाकिस्तानला 19.5 षटकांत 147 धावांत ऑलआऊट केले. मात्र, या लक्ष्याचा पाठलाग करणे टीम इंडियासाठी सोपे नव्हते. पण अखेरीस टीम इंडियाने 19.4 षटकांत 5 विकेट गमावून 148 धावा करून विजय मिळवला. या विजयासह भारताचा पुढील फेरीत प्रवेश निश्चित आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Amol Mitkari | अमोल मिटकरींनी किरीट सोमय्यांची नक्कल करत लगावला खोचक टोला
- Supriya Sule | “रोहित पवार यांना नोटीस आल्या ही एक अफवा, आम्हाला…”, सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं
- IND vs PAK | “मला माहित माझ्यापेक्षा…” ; रोमांचक सामना जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याची ‘त्या’ षटकारावर प्रतिक्रिया
- Gulabrao Patil | “आमच्याकडे बायको नांदत नाहीत तो पण…” ; गुलाबराव पाटलांचे वादग्रस्त विधान
- Mohit Kamboj | मोहित कंबोज यांच्या ट्विटवर रोहित पवार यांची प्रतिक्रीया, ईडीची देखील चौकशी नसल्याचं स्पष्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
