Share

Mohit Kamboj | मोहित कंबोज यांच्या ट्विटवर रोहित पवार यांची प्रतिक्रीया, ईडीची देखील चौकशी नसल्याचं स्पष्ट

Published On: 

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मोहित कंबोज ट्विटरवरून आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधत आहेत. यावर विचारलं असताना रोहित पवार यांनी कंबोज अनेकवेळा दुर्लक्ष केलं आहे. मात्र यावेळेस मोहित कंबोज यांनी ग्रीन एकर्स कंपनीच्या माध्यमातून झालेले व्यवहार आणि बँकांची फसवणूक समोर आणण्याचा प्रयत्न केला. यावर रोहित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. अशातच आता रोहित पवार यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच ईडी कडून अद्याप पर्यंत कोणतीही चौकशी झाली नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मोहित कंबोज केवळ प्रसिद्धीसाठी ट्विट करतातः

सोशल मीडियाचा वापर करुन ट्विट करणं केवळ प्रसिद्धीसाठी करत असल्याचा रोहित पवार यांनी म्हटलं आहे. काहींना तर याचं व्यसन जडलं आहे. मला उद्देशून जे काही ट्विट झाले ते केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचं रोहित पवार यावेळी म्हणाले.

रोहित पवार यांचं स्पष्टीकरणः

याबाबत स्पष्टीकरण देत असताना मला कोणत्याही संस्थेची नोटीस आलेली नसून संस्थांकडून होणारी चौकशी ही काही नवीन नाही. तो एक प्रक्रियेचा भाग आहे. भविष्यात विचारणा झाली तर सहकार्य राहणारच, असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, कंपनीची चौकशी हा नेहमीचा भाग आहे, हे केवळ आता होत नसून गेल्या सात वर्षात ग्रीन एकर्स कंपनीची अनेक वेळा वेगवेगळ्या संस्थांकडून चौकशी झालेली आहे आणि त्यामध्ये गैर काही नाही. शिवाय भविष्यात जरी याबाबत विचारणा झाली तरी आम्ही सहकार्य करणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच विरोधकांनी केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नसून कोणाच्याही आरोपांना उत्तर देण्यासाठी मी बांधील नसल्याचं कडाडून उत्तर रोहित पवार यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!