Share

Amol Mitkari | अमोल मिटकरींनी किरीट सोमय्यांची नक्कल करत लगावला खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी  यांनी राज्यातील सत्ता संघर्षावर मोठं भाष्य केलं आहे. ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेल, त्या दिवशी हे 16 आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर राज्यातील शिंदे-फडणवीसांचं सरकार कोसळल. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते, असं भाकीत मिटकरी यांनी केला आहे. अमोल मिटकरी यांनी यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही हल्ला चढवला. सोमय्यांसारखा महामानव आपल्या महाराष्ट्रात आहे, असं म्हणत मिटकरी यांनी तोतरे बोलत सोमय्यांची खिल्ली उडवली. प्रताप सरनाईक आता जेलमध्ये जातील, असं सोमय्या सांगत होते. ते तर शिंदे गटात गेले. यशवंत जाधव भाजपमध्ये गेले. वॉशिंग पावडर निरमा. भावना गवळीताईंनी तर शिवबंधन काढून मोदीजींना राखी बांधली. ईडी पिडा टळो असे म्हटले असेल. त्या पण झाल्या वाशिंग पावडर निरमा सारख्या साफ झाल्या, अशी टीका त्यांनी केली.

गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या पुण्याईने भाजप पक्ष वाढला आहे. ज्या पद्धतीने तिकीट द्यायचं आणि सुडाचं राजकारण करून त्यांच्याच मुलीचा पराभव केला. रोहिणी गवळी यांना हे लक्षात आलं. आता माझ्या पंकजा मुंडे यांच्याही लवकर लक्षात यायला पाहिजे. कारण, 12 आमदारांची यादी आहे, ती यादी राज्यपाल लवकरच मान्य करतील. मुळात राज्यपालच भाजपचे आहे. पण मला असं समजलं की दुर्दैवाने 12 आमदारांच्या यादीत पंकजा मुंडेंचं नाव नाही. त्यामुळे आपला पक्ष प्रामाणिकपणे वाढवणाऱ्यांचे पंख कसे छाटतात दिसते आहे. रोहिणी ताई यांना पुढचं भविष्य लवकर कळलं, त्यांनी लगेच राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता पंकजा ताईंना सुद्धा याची जाणीव असावी किंवा असेल, त्यामुळे त्यांनी पाऊल उचलावी, असं म्हणत मिटकरींनी एका प्रकारे पंकजांना थेट ऑफरच देऊन टाकली.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!