Share

Aditya Thackrey | शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळावा वरुन आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राचं राजकारण सध्या मोठ्या प्रमाणात तापलेलं दिसत आहे. पावसाळी अधिवेशन संपलं नं संपलं, तेच आता शिवतीर्थावर होणाऱ्या मेळाव्याला अद्याप राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही, त्यामुळे यंदाच्या दसरा रोजी शिवतीर्थावर मेळावा नेमका कोणाचा होणार याबाबत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच आदित्य ठाकरे यांनी खळबळ जनक विधान केलं आहे.

शिवतिर्थावर होणाऱ्या दसरा मेळावा वरुन आदित्य ठाकरे संतापलेः

नागपूर मध्ये माध्यमांशी संवाद साधत असताना शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याबाबत आपण अनविज्ञान आहोत, जे काय होईल ते नियमांमध्येच होईल असं विधान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्यानंतर गद्दारांचा सरकार बनवण्यामागे कोण हे होतं हे आता समोर येत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिंदे सरकारच्या स्थापनेबाबत त्यांनी आज वेगळा दावा केला असून राजकीय वर्तुळात वेगळ्याच विषयाची चर्चा रंगू लागली आहे.

खरी शिवसेना कोणाची हे आता सर्व सामान्य जनतेला माहित आहे. पण दसरा मेळाव्याच्या बाबतीतही राजकारण केलं जात आहे यासारखे दुर्दैव कोणतं नाही. गेल्या दोन दिवसापासून दसरा मेळाव्यावर राजकारण पेटलं आहे पण शिवतीर्थ शिवसेनेचा मेळावा ही एक परंपरा आणि संस्कृती राहिलेली आहे, यामध्ये देखील अडथळा आणण्याचे पाप केलं जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी अर्ज केला जाणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. मात्र तो कोण स्वीकारत नाही त्यामुळे परवानगीसाठी शिवसेनेचे प्रयत्न राहणार आहेत, असं करून परवानगी मिळाली नाही तरी शिवसेनेचा दसरा मेळावा होणार हे आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे. शिवाय मुख्यमंत्री कोण याचं दर्शन राज्यातील जनतेला घडत आहे तसेच गद्दारांची सरकार बनवण्यासाठी पडद्या मागची भूमिका कोणाची होती हे देखील आता समोर येत असल्याचं त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लागवला आहे.

उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रीयाः

दरम्यान, शिवसेना कायम हिंदुत्वावर ठाम राहिलेले आहे. यामध्ये कुठेही बदल झालेला नाही. आगामी काळातही हाच मुद्दा केंद्रस्थानी राहणार आहे. त्यामुळे ज्यांना हा मुद्दा मान्य आहे ते आमच्या सोबत येतील असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. जनता आमच्या सोबतच आहे त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हे वेगळं सांगण्याची गरज नाही पक्ष संघटनेच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे नागपूर दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी शिवसेनेची भूमिका आणि दसरा मेळाव्यात वक्तव्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!