मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड सोबत युती करणार असल्याची घोषणा केल्यानंतर आता याची जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या युतीवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस – विनाशकाली विपरीत बुद्धीः
नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारण्यात आलं होतं. यावर विनाशकाली विपरीत बुद्धी, एवढेच मी म्हणेल, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेनेचा दसरा मेळावा आणि गुलामनबी आझाद यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी या मुद्द्यांवर देखील फडणवीसांनी यावेळी भाष्य केलं आहे.
काँग्रेस एक बुडती जहाज आहेः
काँग्रेस एक बुडती जहाज आहे, ज्यांना हे वाटतं की आता या जहाजाला वाचवता येणार नाही, असे लोक वेगळे निर्णय घेतात. मला वाटत आहे गुलामनबी आझाद यांनी काही वैद्य मुद्दे उपस्थित केले आहेत. मात्र हा काँग्रेसचा अंतर्गत मुद्दा आहे आणि त्यावर मी काय बोलणार? असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
यादरम्यान, एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे पक्षाचा निर्णय काय आहे, हे मला माहीत नाही. ते मिळावा घेणार आहेत की नाही याची देखील मला कल्पना नाही. मात्र जे नियमित असेल ते आम्ही करू, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर शिवसेनेच्या दसरा मेळावा संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शिवाजी पार्कवर हा मेळावा घेण्याची तयारी शिवसेनेकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडून या संदर्भात काय निर्णय घेतला जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्य सरकार नियमा बाहेरचं काही करणार नसल्याची सूचक प्रतिक्रिया फडणवीसांनी यावेळी दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी केली युतीची घोषणाः
दरम्यान, आपण सगळे शिवप्रेमी आहोत, महाराष्ट्र वर असलेला हा दुहीचा शाप आपण काढून टाकू आणि एकत्र येऊन नवीन इतिहास घडवू, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी झालेल्या युतीची घोषणा केली. मात्र उद्धव ठाकरे यांची अवस्था अशी झाली आहे की ते आता सैराट मित्रमंडळासोबत ही युती करतील, अशी खोचक टीका भाजपकडून करण्यात आली आहे. तसेच यावरून आता राजकारण देखील तापत असल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Farhan Akhtar | फरहान अख्तरने आपली ‘जीवनसाथी’ शिबानी दांडेकर हिला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या!
- Asia Cup 2022 : शिष्याला बघून आठवेल गुरू…धोनीची आठवण करून देणारा रिषभ पंतचा हेलिकॉप्टर शॉट!
- Sanjay Raut | संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, स्वप्ना पाटकर करणार गुन्हा दाखल
- Neeraj Chopra | नीरज चोप्रा ‘लुसान डायमंड लीगच्या विजेतेपदासह अॅक्शनमध्ये !
- Uday Umesh Lalit | न्यायमूर्ती उदय उमेश ललित बनले भारताचे 49 वे सरन्यायाधीश, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

