Share

Sanjay Raut | संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, स्वप्ना पाटकर करणार गुन्हा दाखल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि धमकी प्रकरणी संजय राऊत आता पुन्हा अडचणीत सापडणार आहेत. स्वप्ना पाटकर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहेत.

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढः

सोशल मीडियावर मागील महिन्यात फोनवर संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिप मध्ये महिलेला शिवीगाळ करताना एक व्यक्ती आहे. हा व्यक्ती दुसरा कोणी नसून यांचा आवाज संजय राऊत यांचाच असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन राऊतांवर कारवाई व्हावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली. त्यानुसार संजय राऊत यांच्या विरोधात आपीसी 560 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्ना पाटकर करणार गुन्हा दाखलः

आज स्वप्ना पाटकर पुन्हा नाव्याने जबाब नोंदवण्यासाठी जाणार आहेत. वाकोला पोलीस ठाण्यामध्ये स्वप्ना पाटकर दाखल झाल्या असून आता वरिष्ठ अधिकारी याप्रकरणी चौकशी करू शकतात. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

दरम्यान, संजय राऊत हे आर्थर रोड जेलमध्ये पत्राचाळ प्रकरणी मुक्कामी आहेत. मात्र आता महिलेला शिवीगाळ केल्या प्रकरणी त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!