🕒 1 min read
मुंबई : शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. यामध्ये अनेक नेत्यांवर इडीने केलेल्या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला होता. अशातच पवारांनी केलेल्या टीकेला भाजप पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खेळीमुळे शरद पवार चेकमेट झाले आहेत. त्यांच्या पक्षाचा भ्रष्टाचार आता उघडकीस आल असल्याचं म्हणत अतुल भातखळकरांनी शरद पवारांना चांगलच फटकारलं आहे.
शरद पवार लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. यांची ही जुनीच तबकडी आहे. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचं समर्थन करणं आणि त्यांना मंत्रीपदावर ठेवणं, यावरुन शरद पवार यांच्या पक्षाचं चारित्र्य काय आहे हेही लक्षात येतं असल्याचं भातखळकर म्हणाले आहेत. तसेच ते असंही म्हणाले की, संजय राऊत यांच्या अटकेला एक महिना होत आहे. चला या निमित्ताने शरद पवार यांना कंठ फुटला. त्यांना संजय राऊत यांचं समर्थन केल्याशिवाय पर्याय नाही. कारण, एकमेकांना सांभाळू आणि दोघे मिळून खाऊ, असं सुरु आहे.
दरम्यान, देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. जिथं नव्हती तिथं आणली गेली. महाराष्ट्रातही भाजपची हुकुमत नव्हती, पण शिवसेनेचे आमदार गेल्यानं भाजपची हुकुमत आली आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Supreme Court | शिंदे गटाच्या दोन्ही मागण्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या – सुभाष देसाई
- Uddhav Thackeray। मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधानभवनात हजर
- Eknath Shinde । “माझ्याकडे सगळ्यांचा चिठ्ठा एक-एक काढू शकतो, परंतु…” ; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा!
- Shrikant Shinde । रिक्षावालाच भारी, मर्सिडीज मधून पक्ष वाढू शकत नाही; श्रीकांत शिंदेंची थेट आदित्य ठाकरेंवर टीका
- CM Eknath Shinde | मुंबई पालिका क्षेत्रातील रस्ते काँक्रिटचे करणार ; एकनाथ शिंदेंची विधानसभेत माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
