🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट तयार करून, राज्यात सरकार स्थापन केल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. सत्ताधारी नेते शिवसेना पक्षातील नेत्यांना टार्गेट करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. भाजपाचे आमदार राम सातपुते यांनी राज्याचे माजी मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एक भाष्य केलं होतं. त्याचाच समाचार घेतानी शिवसेना पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केला केला आहे.
कोण हे राम सातपुते. भाजपचे आमदार का? काय त्यांची भाषा, हेच का भाजपचे हिंदुत्वाचे संस्कार. देवेंद्र फडणवीसजी यांच्यावर कारवाई करून दाखवा, नाहीतर रामराज्याची भाषा करू नका, असं म्हणत अरविंद सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाण साधला आहे.
अरविंद सावंत यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून यासंबंधी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी हे सगळं लिहिलं आहे.
कोण हे राम ! सातपुते.. भाजपचे आमदार का? काय त्यांची भाषा, हेच का भाजपचे हिंदुत्वाचे संस्कार! आदरणीय नेत्यांचा असा घोर अपमान करणारे राज्यकर्ते भाजपचे अलंकार झालेत.
हे कसले राम, हे तर हराम. यांच्यावर कारवाई करून दाखवा, नाहीतर @Dev_Fadnavis जी रामराज्याची भाषा करू नका.@AUThackeray pic.twitter.com/2EysmbOfeb— Arvind Sawant (@AGSawant) August 22, 2022
तसेच आदरणीय नेत्यांचा असा घोर अपमान करणारे राज्यकर्ते भाजपचे अलंकार झालेत. हे कसले राम, हे तर हराम, असं म्हणत अरविंद सावंत यांनी राम सातपुते यांनाही अरविंद सावंत यांनी लक्ष्य केलं आहे.
दरम्यान, अरविंद सावंत यांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस काय प्रत्युत्तर देतील, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Wedding| मेटाचे माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शेरिल सँडबर्ग अन् उद्योजक टॉम बर्नथल यांनी रचला विवाह
- Kangana Ranaut| …म्हणून फिल्मफेअर अवाॅर्ड यांनी कंगणा राणावत हिचं नाॅमिनेशन घेतलं परत
- Attack On CM Convoy । मोठी बातमी : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर दगडफेक, स्थानिकांनी फोडल्या गाडीच्या काचा
- आदरणीय नेत्यांचा अपमान करणारे, हे कसले राम हे तर हराम- अरविंद सावंत
- Amravati।अमरावतीत क्रीडा विद्यापीठासाठी शासनस्तरावर लवकरच समिती नेमणार; फडणवीसांची ग्वाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
