Share

Ambadas Danve | आशिष शेलार वाचाळ, भाजपने सोडलेल पिल्लू आहे – अंबादास दानवे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर सडकून टीका केली. तसेच शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे असं म्हणत आहेत आणि शिवसेना प्रमुखांची शिवसेना फोडायचं पापही भाजप करत आहे. त्यामुळे या पापाचे खरे धनी भाजपच आहे, जर तुम्हाला शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे तर तुम्ही शिवसेना का फोडताय? शिवसेना नेत्यांमागे तपास यंत्रणा का लावताय?” असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

 

“आशिष शेलार यांची प्रतिमा वाचाळ अशी तयार झाली आहे. ते भाजपने सोडलेलं एक पिल्लू आहे. कालच्या भाषणात त्यांनी असं म्हटलं कि आम्हाला शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या स्वप्नातला भारत तयार करायचा आहे. याचा अर्थ असा कि मोदींचा करिष्मा आता संपला आहे. स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांच्या नावावर मतं मागता येत नाहीत. म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव पुढे करून मतं मागण्याचा प्रकार सुरु आहे. भाजपचा हा भंपकपणा अक्ख्या महाराष्ट्राला माहित आहे”, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!