🕒 1 min read
Rohit Pawar | मुंबई : काल श्रीकृष्णाचा जन्मदिवस होता. त्यामुळे काल देशभरात सगळीकडे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली गेली. जन्माष्टमीचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंदाना सरकारी नोकरीमध्ये 5 टक्के आरक्षण मिळणार असल्याची घोषणा केली. हा निर्णय झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळतं आहे. शिंदे घेतलेल्या निर्णयाच्याविरोधात अनेक राजकीय नेत्यांनी वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही या निर्णयावर टीका केली आहे.
गोविंदाना खेळाडू कोट्यातून 5 टक्के आरक्षण-
दहीहंडीतील गोविंदाना खेळाडू कोट्यातून 5 टक्के आरक्षण देण्याचा बुलेट ट्रेनच्या वेगाने घेतलेला निर्णय हा आगामी महापालिका निवडणुकीत विजयाची हंडी फोडण्यासाठीच घेतल्याची दाट शंका येत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवारांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून यासंदर्भात ट्विट केलं आहे. तसेच अनेक विद्यार्थी आणि खेळाडूंनी फोन करुन त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली असल्याचंही त्यांनी त्या ट्विटमध्ये सांगितलं आहे.
निर्णय व्यापक विचारांतीच घ्यायला हवा-
त्याचबरोबर पुढे त्यांनी लिहिलं आहे की, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाला विरोध नाही. मात्र कुठलाही निर्णय व्यापक विचारांतीच घ्यायला हवा. एवढ्याच सुपर फास्ट गतीने निर्णय घ्यायचे असतील तर खेळाडूंच्या नियुक्त्या, नोकरभरती यासंदर्भातील निर्णय घ्यावेत. पण युवकांच्या भविष्याशी निगडित विषयांबाबत राजकारण होऊ नये, ही अपेक्षा.
दहीहंडीतील गोविंदाना खेळाडू कोट्यातून ५ टक्के आरक्षण देण्याचा बुलेट ट्रेनच्या वेगाने घेतलेला निर्णय हा आगामी महापालिका निवडणुकीत विजयाची हंडी फोडण्यासाठीच घेतल्याची दाट शंका येते. याबाबत अनेक विद्यार्थी आणि खेळाडूंनी फोन करुन त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 20, 2022
राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध नाही, मात्र कुठलाही निर्णय व्यापक विचारांतीच घ्यायला हवा. एवढ्याच सुपर फास्ट गतीने निर्णय घ्यायचे असतील तर खेळाडूंच्या नियुक्त्या, नोकरभरती यासंदर्भातील निर्णय घ्यावेत. पण युवकांच्या भविष्याशी निगडित विषयांबाबत राजकारण होऊ नये, ही अपेक्षा.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 20, 2022
तृप्ती देसाई यांनीही शिंदे सरकारवर हल्लाबोल-
दरम्यान, रोहित पवार यांच्या व्यतिरीक्त समाजसेविका तृप्ती देसाई यांनीही शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. वर्षातून एक दिवस दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या गोविंदांना नोकरीत आरक्षण देण्यापेक्षा दररोज साहसी डोंबारी खेळ करणाऱ्या गोरगरीब मुलांना आरक्षण द्या, आशीर्वाद तरी मिळतील, असं तृप्ती देसाई यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Cricket News | “रात्री 10 पेग प्यायल्यानंतर दुसऱ्या दिवशी ठोकले शतक” ; माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य
- Gulabrao Patil । एकनाथ शिंदेंनी पन्नास थरांची दहीहंडी फोडली म्हणूनच राज्यात सत्तांतरण झाले – गुलाबराव पाटील
- स्पर्धा परिक्षा देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पद भरती मध्ये ‘इतक्या’ पदांची झाली वाढ
- Delhi । दिल्लीत घडामोडींना वेग; सिसोदिया यांच्यावरील छापेमारीननंतर तात्काळ १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
- Manish Sisodia । “भ्रष्टाचार केलेला नाही, त्यामुळे…”; 14 तासांच्या तपासणीनंतर मनीष सिसोदियांची मोठी प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
