🕒 1 min read
Chhagan Bhujbal । मुंबई : राज्यात नव सरकार स्थापन झाल्यानंतर ४० दिवसानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र काल झालेल्या खातेवाटपात शिवसेनेच्या वाट्याला जुनीचं खाती आली. तर, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात शिवसेनकडे असणारी काही खाती देखील भाजपकडे गेली आहेत. त्यामुळं शिवसेनेत बंडखोरी करुन शिंदे गटात गेलेल्या मंत्र्यांच्या हाती काय लागलं हा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. यावरून आता माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी टोला लगावला आहे.
छगन भुजबळ यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले कि, अखेर खाते वाटप झालं आहे हे महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न कुणाला सांगायचे हा प्रश्नच होता. अजून खूप मंत्री यायचे आहेत. त्यावेळेस खात्यांचं पुनर्वाटप होईल. जे खातं दिल आहे, त्यात काम करून दाखवलं पाहिजे. भाजपकडे जास्त मंत्री आहेत. मुख्य वाटा जर भाजपकडे गेला असेल तर चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. शिंदे गटातील अनेकांनी सांगितलं आम्ही सत्तेसाठी आलो नाही. मग आता कशाला रडता?, असा टोला भुजबळ यांनी लगावला.
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील टोला लगावला. आज शिंदे साहेबांचं सरकार आहे. आज त्यांच्या सरकारमध्ये कुणाला मंत्री घ्यायचं, कुणाला नाही घ्यायचं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. कुणाला कोणती खाती द्यायची हा देखील सर्वस्वी अधिकार एकनाथराव शिंदे साहेबांचा आहे. त्यामुळे त्याबद्दल त्यांना जे योग्य वाटलं आणि आपण जे म्हणतो की हे वजनदार खातं, हे थोडसं हलकं फुलकं खातं असं नाही. तुम्हाला काम करायचं म्हटलं तर कुठल्याही खात्यामध्ये तुम्ही काम करु शकता. त्यातून वेगवेगळे लोक अनेक अर्थ काढू शकतात, असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrashekhar Bawankule | विनायक मेटेंचा घात की अपघात यासाठी तपास यंत्रणा लावली आहे – चंद्रशेखर बावनकुळे
- Abdul Sattar | भाजपने ८० टक्के खाते स्वत:कडे ठेवली? अब्दुल सत्तार म्हणाले…
- Jitendra Awhad | “गळा घोटण्याचा प्रकार करु नका” ; सुधीर मुनगंटीवारांच्या ‘त्या’ निर्णयावर आव्हाडांची टीका
- Independence Day | ऐका ढोल ताशावर वाजणारे इन्ट्रुमेंटल राष्ट्रगीत; अमृत महोत्सवानिमित्त अनोखी संकल्पना
- Deepak Kesarkar | मी कोणतेही खाते मागितले नव्हते – दीपक केसरकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

