Share

Supriya Sule | सुप्रिया सुळे यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार! वाचा, नक्की काय आहे प्रकरण?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सत्ता येते आणि जाते आपण लोकांसाठी काम करत राहायचे, जनतेची सेवा करणे महत्त्वाचे, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. तसेच पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणाले कि, देशाचे भविष्यात सगळे कामकाज महिलांच्या समतेच्या अधिकारांचे पालन करून होईल. या वक्तव्याचे त्यांनी स्वागत केले आणि त्या म्हणाल्या, “तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्र राज्याने सर्वप्रथम महिलांना आरक्षण दिले. त्यांना निर्णय प्रक्रियेत स्थान दिले. शरद पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेण्यात आला. आज पंतप्रधान जे बोलत आहेत त्या निर्णयाचे बीज याच महाराष्ट्रात रोवण्यात आले, याचा अभिमान वाटतो.” पुढे महाराष्ट्रात महिला धोरणाबाबत किती काम झाले आहे याची सगळी माहिती पंतप्रधानांना दिली पाहिजे, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांना विनंती केली की देशातील पहिले महिला धोरण व त्याविषयी महाराष्ट्रात झालेले काम याची माहिती पंतप्रधानांना पाठवावी.

तसेच पुढे त्या असेही म्हणाल्या कि, “आज पंतप्रधानांनी केलेल्या भाषणात शिक्षणाला प्राधान्य, महिला धोरण, विज्ञान क्षेत्राची वाढ, तंत्रज्ञान विकास, श्रद्धा व अंधश्रद्धांबाबत डोळस भूमिका घेण्यात आली. पण या गोष्टींची सुरूवात महाराष्ट्रात झाली याचा अभिमान आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताचे स्वप्न पाहिले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिले. ज्याद्वारे आपल्याला मताचा अधिकार मिळाला, स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला, ज्या चौकटीत आपला देश आज ७५ वर्षे चालला आहे, त्या संविधानासमोर आज आपण नतमस्तक व्हायला हवे.” तसेच शाहू, फुले, आंबेडकर, सावित्रीबाईंचा विचार सगळीकडे पोहचायला हवा, अशा भावनाही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!