🕒 1 min read
मुंबई : आमची आघाडी काही नैसर्गिक आघाडी नाही. आम्ही विपरीत परिस्थितीत आघाडी केली होती. महाविकास आघाडीतील निर्णय घेताना आम्हाला विचारले जात नसेल, आमच्याशी चर्चा केली जात नसेल तर आम्हालाही विचार करावा लागेल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते. त्यावर आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ज्यांचे संख्याबळ जास्त असते त्यांचा विरोधी पक्षनेता असतो, असे अजित पवार म्हणाले.
“ज्यांचे संख्याबळ जास्त असते त्यांचा विरोधी पक्षनेता म्हणून नेमणूक केली जाते. विधानसभेत राष्ट्रवादीची संख्या जास्त असल्यामुळे राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेता झाला. पण वरच्या सभागृहात १२ नेते शिवसेनेचे आहेत आणि राष्ट्रवादी, काँग्रेसचे प्रत्येकी १०-१० आहेत. त्याचबरोबर एका अपक्ष आमदाराचा शिवसेनेला पाठिंबा आहे. तर राष्ट्रवादीला एकूण ३ आमदारांचा पाठिंबा आहे. पण विधानसभेत आमचा विरोधी पक्षनेता असल्याने आम्ही सगळ्यांनीच दानवेंला मान्यता दिली. त्यामुळे जे झालं ते झालं.”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:
- Anil bonde | “शरद पवारांना पलटी मारण्याची खूप सवय आहे”; अनिल बोंडे यांची खोचक टीका
- Ashok Chavan | “…आता खातेवाटपासाठी ४० दिवस घालवणार का?”- अशोक चव्हाण
- Anil bonde | शिंदे आणि फडणवीस हे सर्वसमावेशक मंत्रिमंडळ बनवतील- अनिल बोंडे
- Ramdas Kadam । ‘शिवबंधन बांधून आयुष्यभरासाठी राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न झाला’, कदमांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
- Ravi Rana | निराश होण्याच कारण नाही मला लवकरच मंत्री पद मिळेल – रवी राणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
