Share

Uddhav Thackeray । राज्यपालांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आलीय – उद्धव ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

Uddhav Thackeray । मुंबई: आपल्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सातत्याने चर्चेत असतात. त्यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह विधान केले आहे. मुंबईमधून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई, ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. त्यानंतर मात्र मुंबईची ओळखही उरणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. यानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपालांवर टीका केली आहे.

राज्यपालांनी केलेलं विधान हे अनावधानाने आलं नसून यामागे दिल्लीतलं राजकारण असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलाय. पुढे ते म्हणाले कि, महाराष्ट्रातील चांगल्या गोष्टी त्यांनी पाहिल्या असतील. महाराष्ट्र का घी देखा, पण कोल्हापूरका जोडा नही देखा. कोल्हापूर वाहन आहे. तो जोडा त्यांना दाखवण्याचं त्यांना गरज आहे. कोल्हापुरी वहान जगप्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ काय लावायचा तो लावा. मी त्यावर बोलणार नाही. पण महाराष्ट्रातील कष्टकरी लोकांनी तो तयार केला आहे, असे ते म्हणाले.

यावेळी पुढे दिल्लीत बसले असले तरी काही जणांचा जीव मुंबईत आहे, असे ते म्हणाले. याचे कारण म्हणजे पैसा. हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उघडपणे सांगितले आहे. अनवधानाने का होईना त्यांनी आपला हेतू स्पष्ट केला आहे. त्यांना मुंबईचे वैभव व पैसा गिळायचं आहे. हे मान्य केल्याबद्दल राज्यपालांना धन्यवाद देईन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील याआधी ट्विट करत राज्यपालांवर टीका केली होती. ते म्हणाले कि, महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला..स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका..मुख्यमंत्री शिंदे..राज्यपालांचा साधा निषेध तरी करा.मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे.. ऐका .. ऐका…, असं राऊत ट्विटमध्ये म्हणालेत. तर काय ती झाडी… काय तो डोंगर… काय नदी… आणि आता… काय हा मराठी माणूस… महाराष्ट्राचा घोर अपमान! 50 खोके वाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत, अशी टीकाही राऊत यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये केली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!