Share

Jayant Patil | “…तर खुशाल तिकडे जाऊन रहावे”; जयंत पाटलांचा राज्यपालांना खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आधीच तापलेलं आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे ती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे. कोश्यारी म्हणाले कि, महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यानंतर मुंबई, ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, अस वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यातील अनके बडे नेते प्रतिक्रिया देत राज्यपालांवर टीका करत आहेत. अशीच टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील केली आहे.

मुंबईत पैसा हा गुजराती आणि राजस्थानी माणसांमुळे नसून मुंबईतील कष्टकरी माणसामुळे आहे. मुंबई ही मराठी माणसाच्या कष्टावर उभी आहे, असे जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटलांनी यासंदर्भात ट्विट करत लिहले आहे कि, “घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींनी जपून बोलण्याचा संकेत देशातील सार्वजनिक जीवनात आहे. मात्र, काही महामहिम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत आहे. परराज्यातील व्यक्तींमुळे मुंबईत पैसा नसून राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी आहे. दुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तींनी खुशाल तिकडे जाऊन रहावे.”, असा खोचक सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

पुढे ते असेही म्हणाले कि, “महाराष्ट्राच्या राजधानीत पंचतारांकित व्यवस्थेत राहून महाराष्ट्रातील मराठी माणसांचा अपमान मा. राज्यपाल महोदय करत आहेत. ते मराठी माणूस, महाराष्ट्राचा गौरवशाली व जाज्वल्य इतिहास यांचा वारंवार अपमान का करत आहेत?”. तसेच त्यांनी यावेळी महाराष्ट्रातील भाजपाला राज्यपालांचे हे विधान मान्य आहे का?, असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसले जात आहेत. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा, असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!