Share

Supriya Sule : “ज्या राज्यातून आले आहेत तिथे यांना परत पाठवा”, सुप्रिया सुळे राज्यपालांवर संतापल्या!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच महाराष्ट्र व मुंबई बाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.“राज्यपाल हे पद संविधानिक आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलणं उचित नाही. पण माहाराष्ट्राचे राज्यपाल सतत वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलण्याची वेळ येते. त्यांच्या या विधानाचा मी निषेध करते. राज्यात आपण सगळ्या समाजाचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतो. पण समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होईल, अशीच विधानं सध्या राज्यपाल करत आहेत. अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली आहे. यावेळी त्यांनी राज्यपाल जिथून आले आहेत तिथेच त्यांना परत पाठवा, असेही म्हटले आहे.

राज्यपाल यांच्या मुंबई बाबत वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रातून आता संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याच्या दिसत आहेत. राष्ट्रवादी शिवसेने सोबतच आता मनसेकडूनही राज्यपालांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा जोरदार निषेध केला जात आहे. मुंबईला आणि अख्ख्या महाराष्ट्राला घडविण्यात मराठी माणसांचा मोलाचा वाटा आहे मराठी माणसांमुळेच मुंबई आज एवढी प्रतिष्ठित झाली आहे. त्यामुळे मुंबई बाबत मराठी माणसाचा अपमान ऐकून घेतला जाणार नाही अशी भूमिका सर्वच नेत्यांनी घेतली आहे. राज्यपालांनी एका कार्यक्रमात बोलताना “मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही”, असं राज्यपाल म्हणाले आहेत. “ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही”, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही राज्यपालांना मराठी माणसाला डिवचू नका असा इशारा दिला आहे. आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूध्द बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो. अशा आशयाचे पत्र मनसेकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!