नाशिक : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आधीच तापलेलं आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे ती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे. कोश्यारी म्हणाले कि, महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यानंतर मुंबई, ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, अस वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यातील अनके बडे नेते प्रतिक्रिया देत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया देत राज्यपालांना खडे बोल सुनावले आहेत.
छगन भुजबळ एका खासगी वहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले कि, “राज्यपालांनी असं विधान करून उगाचंच गुजराती, राजस्थानी आणि मराठी माणसातील वाद उकरून काढण्याचे काही कारण नाही. राज्यपालांनी मुंबईचा इतिहास समजून घेतला पाहिजे, मुंबई ही मूळ आगरी, कोळी समाजाची आहे. पोर्तुगीज, इंग्रज आणि कालांतराने आलेल्या पारशी समाजालाही मुंबईचे महत्व माहित होते. गुजराती आणि राजस्थानी सामाज उदयोग धंद्यांसाठी मुंबईत आला. परंतु त्यामुळे मुंबईतील मराठी माणसाचे कष्ट विसरून कसे चालेल”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“मुंबईचे वातावरण पोषक आहे. तसेच इथे बॉलीवूड सुद्धा आहे. मग बॉलीवूडमध्ये काय फक्त गुजराती आणि राजस्थानी सामाजातील लोक आहेत?, तिथे तर पूर्ण भारतभरातून लोक येतात. मुंबईला वीज-पाणी हे सुद्धा महाराष्ट्रातील इतर जिल्हे पुरवतात. मग जर ते पुरवलंच नाही तर कसं होणार?, मुंबईचे आकर्षण हे सगळ्यांनाच आहे. मात्र राज्यपालांनी असं काही बोलणं योग्य नाही. जनतेच्या भावना दुखावल्या जातील किंवा कुणाला डिवचण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य त्यांनी करू नये”, असा सल्लाही भुजबळांनी राज्यपालांना दिला.
जयंत पाटलांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भात ट्विट करत लिहले आहे कि, “घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींनी जपून बोलण्याचा संकेत देशातील सार्वजनिक जीवनात आहे. मात्र, काही महामहिम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत आहे. परराज्यातील व्यक्तींमुळे मुंबईत पैसा नसून राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी आहे. दुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तींनी खुशाल तिकडे जाऊन रहावे.”, असा खोचक सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut | ज्या पद्धतीने राज्यपालांनी वक्तव्य केलं, तो महाराष्ट्राचा अपमान आहे – संजय राऊत
- Jayant Patil | “…तर खुशाल तिकडे जाऊन रहावे”; जयंत पाटलांचा राज्यपालांना खोचक टोला
- Raj Thackeray | मराठी माणसाला डिवचू नका; राज ठाकरेंचा राज्यपालांना इशारा
- Deepak Kesarkar : राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मुख्यमंत्री केंद्राशी बोलणार – दीपक केसरकर
- Gopichand Padalkar | काका-पुतण्यांना मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाहीये – गोपीचंद पडळकर


