🕒 1 min read
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वक्तव्य हे महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अवमान करणारे असल्याचे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. सर्वचं राजकीय पक्षांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा धिक्कार केला आहे. अपवाद फक्त भाजप आणि भाजप पुरस्कृत मुख्यमंत्री आहेत. राज्यपालांच्या वक्तव्याबाबत अद्यापही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निषेध केला नसल्याचे राऊत म्हणाले. तसेच मराठी माणसाला रसातळाला नेण्याचं काम दिल्लीची यंत्रणा करत असल्याचा निशाणा देखील राऊतांनी लगावला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि मुंबई संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही. मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य कोश्यारी यांनी केलं आहे. त्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर विविध स्तरातून टीका होत आहे. सजंय राऊत यांनीही राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. राज्यपालांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणारे 40 आमदार कोणती भूमिका घेणार? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Raj Thackeray | मराठी माणसाला डिवचू नका; राज ठाकरेंचा राज्यपालांना इशारा
- Deepak Kesarkar : राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मुख्यमंत्री केंद्राशी बोलणार – दीपक केसरकर
- Gopichand Padalkar | काका-पुतण्यांना मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाहीये – गोपीचंद पडळकर
- Nitesh Rane | “…तेव्हा त्यांना मराठी माणूस आठवत नाही का?”; नितेश राणेंनी केलं राज्यपालांचं समर्थन
- Eknath Khadse | लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे – एकनाथ खडसे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
