🕒 1 min read
दिल्ली: शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या फोटोंमध्ये शिंदे आणि खोतकर यांच्यासह मंत्री रावसाहेब दानवे देखील होते. त्यामुळे दानवे आणि खोतकर यांच्यातील वाद संपले असल्याची चर्चा सुरु झाली त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत एक खुलासा केला. “दानवेंना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”, असं खोतकर राऊतांना म्हणाले होते.
दरम्यान राऊत यांनी केलेल्या या खुलास्याविषयी अर्जुन खोतकर यांना विचारले असता त्यांनी देखील या वक्तव्याला दुजोरा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खोतकर म्हणाले कि, “होय, मी आठ दिवसांपूर्वी तसं बोललो होतो. खरं तर तेव्हा आमच्यात काही कारणाने कटूता आली होती. पण आमचे पारिवारिक संबंध चांगले होते. आमच्या जिल्ह्यात त्यांनी भाजपकडून आणि मी शिवसेनेकडून काम केलाय. दोघांनीही जिल्हा सांभाळलाय. मी आज सहजच त्यांची भेट घेतली. त्याचा कुणी गैरअर्थ काढू नये. आमच्यातील मदभेद पूर्णपणे संपलेले नाहीत. मात्र त्या दृष्टीने चर्चा सुरु आहे.”
काय म्हणाले होते संजय राऊत
संजय राऊत म्हणाले कि, “दोन दिवसांपूर्वीच माझं आणि खोतकरांचं बोलणं झालं आहे. त्यावेळी बोलताना मी दानवेंना गाडल्याशिवाय शांत बसणार नाही. येत्या निवडणुकीत मी दानवेंना घरी बसवेन, असं खोतकर म्हणाले होते. त्याचबरोबर दानवेंविषयी त्यांनी असे काही शब्द वापरले होते जे मी तुम्हाला सांगूही शकत नाही.” त्याचबरोबर खोतकर शिंदे गटात जाण्याच्या मार्गावर असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना राऊत म्हणाले कि, “जोपर्यंत अर्जुन खोतकर यासंदर्भात स्वत: हून काही सांगत नाहीत, तोपर्यंत ते शिवसेनेतच आहेत.”
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Shirsat | ‘बाळासाहेब ठाकरे’ तुमची प्रॉपर्टी नाही, ते प्रत्येक शिवसैनिकाचं दैवत ; संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
- Sandip Deshpande : “अडीच वर्षे संपत्ती झाली आता पुढची…”, संदीप देशपांडेंची उध्दव ठाकरेंवर खोचक टीका
- Udhdav Thackeray : पालापाचोळा गेला पण ठाण्यातील जनता आजही शिवसेनेसोबत, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- Uddhav Thackeray : स्वतःच्या आईवडिलांना घेऊन मत मागवीत, माझे वडील का चोरताय ?, उद्धव ठाकरेंचा सवाल
- Udhdav Thackeray: “बाळासाहेबांचं नाव नाही घेतलं तर लोकं…”, उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका


