🕒 1 min read
मुंबई : राज्यातील राजकारणात गेल्या एक महिना भरापासून सर्वत्र शिवसेना पक्षाचीच चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर शिवसेनेला खिंडार पडली. एकामागे एक शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात सामील होऊ लागले आहेत. दरम्यान शिवसेनेच्या या होत असलेल्या स्थितीवर मनसेने टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. त्यांनी या अगोदरही अनेक वेळा शिवसेना तसेच ठाकरेंवर टीका केलेली आहे.
शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमच मुलाखत दिली. शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये ठाकरेंनी बऱ्याच गोष्टींवर भाष्यही केले. त्यांच्या या मुलाखतीवर आता मनसेकडून टीका करण्यात आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. अडीच वर्षे संपत्ती झाली आता पुढची अडीच वर्षे “simpathy”, अशा शब्दात देशपांडेंनी टीका केली आहे.
अडीच वर्षे संपत्ती झाली आता पुढची अडीच वर्षे "simpathy"#मुलाखत
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 26, 2022
संदीप देशपांडे यांनी या अगोदरही शिवसेनेवर अनेक वेळा टीका केलेली आहे. ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा!’ यासोबत संदीप देशपांडेंनी राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचा एक फोटोही शेअर केला होता. महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात घडलेल्या राजकीय भूकंपानंतर राज ठाकरे यांच्या फोटोसह संदीप देशपांडे यांनी केलेल्या या ट्वीटचे अनेक अर्थ राजकीय जाणकारांकडून काढले जात आहेत.
अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा pic.twitter.com/2QxhYD8OeR
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 25, 2022
महत्वाच्या बातम्या :
- Udhdav Thackeray : पालापाचोळा गेला पण ठाण्यातील जनता आजही शिवसेनेसोबत, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- Uddhav Thackeray : स्वतःच्या आईवडिलांना घेऊन मत मागवीत, माझे वडील का चोरताय ?, उद्धव ठाकरेंचा सवाल
- Udhdav Thackeray: “बाळासाहेबांचं नाव नाही घेतलं तर लोकं…”, उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका
- Uddhav Thackeray : झाडी, डोंगार, हाटील महाराष्ट्रात नाही का? उद्धव ठाकरेंचा शहाजीबापू पाटलांना सवाल
- Uddhav Thackeray : आम्हाला पुरावे द्यायची गरज नाही, शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्धव ठाकरे म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

