Share

sanjay raut | खोतकर म्हणाले, दानवेंना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; संजय राऊतांचा खुलासा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या फोटोंमध्ये शिंदे आणि खोतकर यांच्यासह मंत्री रावसाहेब दानवे देखील होते. त्यामुळेच खोतकर यांनी शिवसेनेला रामराम ठोकून शिंदे गटात सामील झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या मात्र त्यांनतर स्वतः खोतकर मी शिवसेना सोडून गेलो नाही, जाणार नाही, असं सांगितलं होत. दुसरीकडे या भेटीनंतर दानवे आणि खोतकर यांच्यातील वाद संपले असून आज देखील या दोघांची भेट झाली असल्याचीही माहिती आता समोर येत आहे. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत एक खुलासा केला आहे.

संजय राऊत म्हणाले कि, “दोन दिवसांपूर्वीच माझं आणि खोतकरांचं बोलणं झालं आहे. त्यावेळी बोलताना त्यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली होती. मी दानवेंना गाडल्याशिवाय शांत बसणार नाही, असं देखील ते म्हणाले होते. त्याचबरोबर दानवेंविषयी त्यांनी असे काही शब्द वापरले होते जे मी तुम्हाला सांगूही शकत नाही.” त्याचबरोबर खोतकर शिंदे गटात जाण्याच्या मार्गावर असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना राऊत म्हणाले कि, “जोपर्यंत अर्जुन खोतकर यासंदर्भात स्वत: हून काही सांगत नाहीत, तोपर्यंत ते शिवसेनेतच आहेत.”

आज अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांची आज भेट घेतली. या भेटीत त्यांची तब्बल दीड तास चर्चा झाली. त्यामुळे जालन्याच्या या दोन्ही मातब्बर विरोधकांचे वाद आता मिटले आहेत, अशी चर्चा रंगू लागली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना दानवे म्हणाले कि, “आमच्या दोघांमधले वाद आता मिटले आहेत. एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता त्यामुळे त्यांच्यासमोर आम्ही एकमेकांना साखर भरवली.”

महतवाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!