🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर पक्षाला मोठी खिंड पडली. या बंडामुळे पक्षातील अनेक मोठे नेते एकनाथ शिंदे यांना समर्थन करत शिवसेनेतून बाहेर पडले. या घडामोडीनंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. त्यांनी भाजपची हात मिळवून राज्यात सत्ता स्थापन केली. या घडामोडी दरम्यान शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर बंडखोर आमदारांनी कडाडून टीका केली होती. दरम्यान आता संजय राऊत यांनी ‘सामना’साठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. या टीकेला आमदार संजय शिरसाट यांनी जोरदार पलटवार केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बाळासाहेबांचे नाव न घेण्याचे आवाहन बंडखोर आमदारांना केले आहे. शिवसेनेचा बाप, बाळासाहेब ठाकरेंच्या नावाशिवाय निवडून या, तुम्ही तुमच्या वडीलांचे फोटो लावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेनेतून गेलेल्या आमदारांचा पालापाचोळा असा उल्लेख केला आहे.
“शिवसेना प्रमुखांची उंची तुम्ही कमी करू नका. त्यांच्या पुण्याईमुळे आम्ही घडलो आहोत. त्यांना तुम्ही एवढं छोटं कमी करण्याचा का प्रयत्न करताय? राजकारण करायचं तर स्वतःचा ठसा उमटवा. आजही पहिलं नाव छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि नंतर बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेता. त्या दर्जात उच्च पदाला गेलेला हा माणूस आहे. त्याला खाली खेचायचं काम करू नका. शिवसेना प्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही, ती प्रत्येक शिवसैनिकाचं दैवत आहे. त्यांचा उल्लेख पुन्हा असा करू नका. त्यांना खुजं करू नका.”
“शिवसेना प्रमुख हे आमचे आहेत त्यांनी सांगितले, पण ते फक्त त्यांचेच नाहित तर संपुर्ण जगाचे आहेत. आज मुख्यमंत्री कार्यालयात जा तिथे गर्दी बघा, बाळासाहेबांचं फोटो बघा, कृपया आज त्यांची उंची तुम्ही कमी करु नका. एखाद्याला खाली खेचायच काम तुम्ही कमी नका करु शिवसेना प्रमुख आमचे दैवत आहेत,” असे संजय शिरसाट म्हणाले.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना संजय शिरसाट म्हणाले. “कोणीही जुना नेता तुमच्या बाजूला बसत नाही, याचा विचार करा. आम्ही पालापाचोळा नाही. आम्ही आमची हयात शिवसेना वाढीत घालवली, त्याचा विचार करा.”
“एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. आजारपणात कही घडलं नाही. आमची चिंता तुम्ही करू नका, आम्ही कशात जायचं. आमचा रस्ता आम्ही पाहू,” असे शिरसाट म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Sandip Deshpande : “अडीच वर्षे संपत्ती झाली आता पुढची…”, संदीप देशपांडेंची उध्दव ठाकरेंवर खोचक टीका
- Udhdav Thackeray : पालापाचोळा गेला पण ठाण्यातील जनता आजही शिवसेनेसोबत, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- Uddhav Thackeray : स्वतःच्या आईवडिलांना घेऊन मत मागवीत, माझे वडील का चोरताय ?, उद्धव ठाकरेंचा सवाल
- Udhdav Thackeray: “बाळासाहेबांचं नाव नाही घेतलं तर लोकं…”, उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका
- Uddhav Thackeray : झाडी, डोंगार, हाटील महाराष्ट्रात नाही का? उद्धव ठाकरेंचा शहाजीबापू पाटलांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

