🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान वेस्ट इंडिजचा (IND vs WI) २ गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारतीय संघाचा वेस्ट इंडीजवर हा सलग १२ वा एकदिवसीय मालिका विजय आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील विजयसह भारताने मालिका विजयाच्या विक्रमामध्ये पाकिस्तानला मागे टाकले आहे. पाकिस्तान संघाने झिम्बाब्वेविरुद्ध सलग ११ एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत. या विक्रमाव्यतिरिक्त सामन्यात आणखी एक विशेष बाब घडली. सामन्यात दीपक हुडा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाच्या जर्सीत दिसला. यानंतर नेटकऱ्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
प्रसिद्ध कृष्णा या सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. त्याच्या जागी आवेश खानला एकदिवसीयमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. प्रथम गोलंदाजी करताना भारताला पहिले यश दीपक हुड्डा याच्यामुळे मिळाले. त्याने काइल मेयर्सला त्याच्याच गोलंदाजीवर झेलबाद करून वेस्टइंडीजला पहिला धक्का दिला. या सामन्यात हुडाच्या या कामगिरीपेक्षा त्याच्या जर्सीचीच जास्त चर्चा झाली. सामन्याच्या सुरुवातीला हुडाच्या जर्सीच्या मागील बाजूस टेप लावलेला होता. खेळ पुढे जात असताना हुडाच्या जर्सीला लावलेला टेप निघून गेला. त्यानंतर ही जर्सी प्रसिद्ध कृष्णाची असल्याचे आढळून आले. कारण जर्सीवर मागच्या बाजूला नाव लिहिले होते.
@HoodaOnFire Where's your jersey man? pic.twitter.com/SKAc8TERbG
— Trouble Shootist (@scichaos) July 25, 2022
दीपक हुडाच्या अंगावर प्रसिद्ध कृष्णाची जर्सी पाहून चाहत्यांनीही सोशल मीडियावर बीसीसीआयची चांगलीच खिल्ली उडवली. काही नेटकऱ्यांनी तर बीसीसीआयलाच थेट विचारले की, वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्यांचे बजेट कमी आहे का? सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव होत होता. एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘दीपक हुड्डा याने प्रसिद्ध कृष्णाची जर्सी का घातली आहे? बीसीसीआयचे बजेट कमी आहे का? दीपक हुडाने प्रसिद्ध कृष्णाची जर्सी का घातली हे मात्र समजले नाही, पण या प्रकारामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेक मेटकरी या प्रकारामुळे बीसीसीआयला ट्रोल करत आहेत.
https://twitter.com/Abdullah__Neaz/status/1551215973751209984?s=20&t=kHJC0odMQ50Yb7KfvkyWUQ
महत्वाच्या बातम्या :
- Nilesh Rane: “… आणि फक्त अंधारातच बाळासाहेब आठवतात”, निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
- Ravikant tupkar | विदर्भातील शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले – रविकांत तुपकर
- Kishori Pednekar : मग काय शेजाऱ्याचा बेटा राजा बनेल का?, पेडणेकरांचा संदीप देशपांडेंचा थेट सवाल
- Yashomati Thakur | क्वालिटीचं काम नाही झालं तर डोकं फोडेल – यशोमती ठाकूर
- Arjun khotkar | “मी शिवसेना प्रमुखांशी एकनिष्ठ”; अर्जुन खोतकरांनी लावला शिंदे गटात गेल्याच्या चर्चांना ब्रेक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
