Share

Nitesh Rane : सेनेचा NDA ला पाठींबा असताना राऊत विरोधकांसोबत का? ; राणे बंधूंनी ‘निष्ठावंत’ म्हणत डिवचले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आज १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. मात्र असे असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मात्र विरोधी पक्षाच्या बैठकीला हजेरी लावली. विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावरूनच भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे (Nitesh Rane) आणि निलेश राणे (Nilesh Rane) यांनी टीका केली आहे.

“उद्धव ठाकरे यांनी आधीच एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही का? मग विरोधी पक्षाच्या बैठकीत संजय राऊत काय करत आहेत? उद्धवजी कधीही न येण्यापेक्षा उशीर बरा?”, असे ट्वीट करत एकप्रकारे नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा युतीसाठी आमंत्रण दिले आहे.

तर निलेश राणे यांनी विरोधी पक्षाच्या बैठकीचा फोटो पोस्ट करत “मॅच हरलेल्या नंतर प्लेयर ड्रेसिंग रूम.”,असे म्हणत विरोधकांना हिणवले आहे. दरम्यान शिवसेनेसह इतर अनेक पक्षांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेसवर निशाणा साधत टीका केली आहे.

काँग्रेस पक्षाकडून दिवाळखोरीचं राजकारण- प्रकाश आंबेडकर

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी माझ्याकडे एकही मत नाही. मात्र काँग्रेस पक्षाकडून दिवाळखोरीचं राजकारण चालू असून कॉंग्रेस अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यासमोर शरण गेला आहे. अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. “मी अगोदरच म्हणालो होतो की, राष्ट्रपती पदाचा उमेदवार आदिवासी वर्गातला हवा. एकीकडे ते स्वत:ला विचारांचे ठेकेदार समजतात. पण दुर्दैवाने ते अक्कलशून्य आहेत.”, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.

 

यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार घ्यावी-प्रकाश आंबेडकर

“यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याची विनंती करत आहे कारण, अनेक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे सदस्य मॅडम द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी सामील होत आहेत.”, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. दरम्यान राष्ट्रपतीपदासाठी १८  जुलैला मतदान होणार आहे.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना कोणाला पाठिंबा देणार?
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मार्गारेट आल्वा यांच्या नावावर सर्वांचे एकमत असून त्या अनुभवी नेत्या आहेत. आम्ही त्यांच्या पाठीशी राहू, असे संजय राऊत म्हणाले. असे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!